आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fund Collect Permission Compulsory For Temple Trust

देणगीसाठीही ट्रस्टला घ्यावी लागणार परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - संस्था किंवा ट्रस्टची नोंदणी करण्यासाठी संस्थेची नियमावली आणि घटना आवश्यक असते. नोंदणीनंतर घटना किंवा नियमांची पायमल्ली करून केल्या जाणार्‍या कामांना 2009 च्या घटनादुरुस्तीनुसार बंधने आली आहेत. आता घटनेत समाविष्ट कामाव्यतिरिक्त कोणतेही काम संस्था अथवा चॅरिटी ट्रस्टला करता येणार नाही. एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून देणगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी संस्थेला धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच संस्था, चॅरिटी ट्रस्टचे धाबे दणाणले आहेत.

खासगी, पब्लिक ट्रस्ट, शैक्षणिक तसेच धर्मादाय संस्था, हॉस्पिटल, कंपनी, सहकारी संस्था आणि सामाजिक संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्तालयात करण्यात येते. नोंदणी करण्यासाठी संस्थेची उद्दिष्टांनुसार घटना अथवा नियमेावली असते. त्यात उल्लेखित कामेच संस्था अथवा ट्रस्टला करण्याचा अधिकार आहे. याव्यतिरिक्त केली जाणारी कामे अनधिकृत समजली जातील. 2009 पर्यंत अशा कामांकडे लक्षही देण्यात येत नव्हते. मात्र, 2009 मध्ये कायद्यात बदल केल्याने घटनेनुसारच काम करावे लागणार आहे. नसता संस्थाचालकांना तीन ते सहा वष्रे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

सभांसाठीही नियम
सभेत विषय ठेवताना त्याचा सविस्तर उल्लेख करावा लागणार आहे. कुणा सदस्यावर अविश्वास ठराव घ्यायचा असल्यास अगोदर तो जाहीर करणे आवश्यक असून नंतर सर्वांसमोर हा विषय ठेवूनच त्याला मान्यता घ्यावी लागणार आहे. दरवर्षी लेखापरीक्षण वेळेवर करावे लागणार आहे. 11 प्रकारचे नोंदणी रजिस्टर पूर्णपणे अद्ययावत ठेवावे लागणार आहेत. मोठी देणगी देणे, घेणे तसेच जमिनीच्या व्यवहारासह आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता संस्थांना धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय हा व्यवहार गैर ठरवण्यात येणार आहे.

संस्थाचालकांची गोची होणार
पूर्वी संस्थाचालकांकडून नियमांची पायमल्ली करण्यात येत होती. त्यामुळे शासनाने कायद्यात बदल केला आहे. यामुळे त्यांची गोची होत आहे. या कायद्यानुसार आयुक्त एखाद्या संस्थेवर, ट्रस्टवर तत्काळ कोणत्याही स्वरूपाची कारवाई करू शकतात. अँड. मनोज वाडेकर, तज्ज्ञ, पुणे