आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक खात्यांअभावी मुले गणवेशाविनाच; स्वातंत्र्य दिन तोंडावर, तरीही विद्यार्थ्यांना रक्कम नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी करावेत आणि प्रत्येकी ४०० रुपये मनपाकडून घ्यावेत, असे ठरले होते. परंतु स्वातंत्र्यदिन जवळ आला तरीही मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम मिळालेली नाही. झीरो बॅलन्सवर विद्यार्थ्याचे खाते उघडण्यास बँकांनी नकार दिल्याने ही गैरसोय झाली आहे. दुसरीकडे दोन गणवेशांसाठी ४०० रुपये ही तोकडी रक्कम देण्यात येत असल्याने पालकांचीही नाराजी आहे. 
 
नव्या नियमानुसार विद्यार्थी त्याच्या आईचे संयुक्त खाते उघडून त्यात गणवेशाची रक्कम द्यावी, असे शासनाने कळवले आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे एक तर बँकेत खाते नाही. बँकेत खाते उघडण्यासाठी गेले तर किमान ५०० रुपये जमा करावे लागतात. म्हणजे ५०० रुपये आधी जमा करून नंतर त्या खात्यात गणवेशाचे ४०० रुपये जमा होणार असल्याने पालकही फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे आतापर्यंत एकाही विद्यार्थ्याने गणवेश घेतल्याची पावती आणून मुख्याध्यापकाकडून ४०० रुपयांचा धनादेश घेतलेला नाही. त्यामुळे रक्कम मुख्याध्यापकांच्याच खात्यावर जमा आहे. 
 
बँकांनी विशेष बाब म्हणून विद्यार्थी त्यांच्या आईचे खाते झीरो बॅलन्सवर उघडावे, अशी सूचना मनपाने केली. परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिखर बँकेला पत्र दिले असून तातडीने ही खाती उघडण्याच्या सूचना दिल्याचे महापौर भगवान घडमोडे यांनी सांगितले. तसे झाले तर स्वातंत्र्यदिनाच्या सुमारास विद्यार्थी बँकेत खाते उघडून गणवेशासाठी ४०० रुपये घेऊ शकतील. 
 
अट शिथिल करण्याची शिक्षक, पालकांची मागणी 
गणवेश घेतल्याची पावती सादर केल्यानंतर पैसे द्यावेत, अशी अट आहे. ही अट शिथिल करावी, अशी शिक्षक तसेच पालकांची मागणी आहे. कारण गरीब पालकांकडे पैसे नाहीत. त्यामुळेच ही योजना यशस्वी होत नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...