आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संदीप जाधव अमर रहे’च्या जयघोषात शहिदाला निरोप, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीर जवान संदीप जाधव यांना लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. - Divya Marathi
वीर जवान संदीप जाधव यांना लष्कराच्या जवानांनी सलामी दिली.
आमठाणा (ता.सिल्लोड)/कोल्हापूर - सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील वीर पुत्र संदीप जाधव यांच्यावर शनिवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातील ५० ते ६० हजार लोकांनी गर्दी केली होती.

शहीद संदीप यांना सैन्यदलाच्या वतीने औरंगाबादच्या मेजरनी पुष्पचक्र अर्पण केले. नंतर हवेत तीन राउंड फायर करून वीरपुत्राला सलामी देण्यात आली. शहीद संदीप यांचा मुलगा शिवेंद्र ऊर्फ पिंट्या, पुतण्या सदाशिव यांनी अग्निडाग दिला तर मुलगी मोहिनी व शिवेंद्र यांनी पाणी पाजले.
गुरुवारी काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना महाराष्ट्रातील संदीप जाधव व कोल्हापूरचे श्रावण माने शहीद झाले होते. संदीप जाधव यांचे पार्थिव कश्मीरहून दिल्ली व दिल्लीहून रात्री १० वाजता औरंगाबादला आण्ण्यात आले. सकाळी नऊ वाजता गावात पार्थिव येणार म्हणून तालुक्यातील लोकांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी केळगाव येथे सकाळपासून गर्दी करण्यास सुरवात केली. तालुक्यातील भराडी, कासोद, तळणी, शिंदेफळ, आमठाणा या गावातून पार्थिव जाणार असल्याने सकाळीच आमठाणा चौफूलीवर संदीप जाधव यांना ग्रामस्थांसह शाळेतील मुलांनी सलामी देऊन “भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. सकाळी ११.१५ वाजता शहीद जाधव यांचा पार्थिव मुरडेश्वर चौफुलीवर दाखल झाले तेथून सैनिकी वाहनातून पार्थिव घरापर्यंत आणण्यात आले. 

पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी : आपल्या लाडक्या वीराला आखेरचा निरोप देण्यासाठी गावात सुमारे ५० ते ६० हजारपेक्षा अधिक जनसागर उसळला होता. परिसरात सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत गर्दी दिसत होती. अंत्यसंस्कारासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरतीसिंह, तहसीलदार संतोष गोरड, उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर, दामू अण्णा गव्हाणे, सुनील मिरकर आदींसह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.
 
काेल्हापूर : मानेंवर अंत्यसंस्कार  
कोल्हापूर - पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे जवान सावन माने यांच्यावर शनिवारी गोगवे या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...