आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सोनिया जी आ रही है' म्‍हणजे Coming Elections, गुगलवर भाषांतराची अशीही फिरकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गुगलने सध्‍या नेटकरांची फिरकी घेताना राजकारणाचीही चांगलीच गिरकी घेतलली दिसत आहे. गुगलवर एका वाक्‍याचे अफलातून भाषांतर होत आहे. ते वाचल्‍यावर तुमचीही दांडी गुल होईल. हे वाक्‍य आहे, 'सोनिया जी आ रही है.' या हिंदी वाक्‍याचे गुगल इंग्रजीमध्‍ये 'Coming Elections' असे भाषांतर होत आहे. उडाली ना दांडी? विश्‍वास बसत नसेल तर तुम्‍ही स्‍वतः पडताळून बघा. (फोटोमध्‍ये भाषांतराच्‍या पेजचा स्‍क्रीनशॉट दिला आहे.)

गुगलवर सध्‍या 65 भाषांमध्‍ये भाषांतराची सोय आहे. माहितीच्‍या जाळ्यात गुगलचे स्‍थान अतिशय वरचे आहे. सर्च इंजिननंतर गुगलने हळूहळू अनेक प्रकारच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन दिल्‍या आहेत. त्‍यातच भाषांतर ही सुविधा अनेक जण वापरतात. परंतु, गुगलवर असे भाषांतर पाहिल्‍यावर चकीत होण्‍याचीच वेळ आली. आता यात दुसरा मुद्दा म्‍हणजे, गुगल हे एक स्‍मार्ट सर्च इंजिन आहे. त्‍यावरील सर्व सुविधा एकमेकांशी लिंक असतात. देशात या वर्षभरात काही राज्‍यांच्‍या विधानसभा निवडणुका आहेत. तर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. कदाचित गुगलच्‍या स्‍मार्ट यंत्रणेने सोनिया गांधी आणि निवडणुकांची स्‍वतःच लिंक लावून असे भाषांतर केले असावे. काहीही असो, हे भाषांतर म्‍हणजे दांडी गुल करणारेच आहे.