आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेब्स हेल्थ केअरचा औरंगाबादेत प्रकल्प, 1200 रोजगारांची निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अमेरिकेतील रुग्णालयांना आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध सेवा पुरवणाऱ्या गेब्स हेल्थ केअर सोल्युशन्सचा नवीन प्रकल्प औरंगाबादेतील चिकलठाणा एमआयडीसीत सुरू झाला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात ५५० रोजगारांची निर्मिती झाली. लवकरच ही संख्या १२०० च्या वर जाणार आहे. येत्या ११ मार्च रोजी कंपनीचे उद्घाटन हाेईल.

२००५ मध्ये स्थापन झालेल्या गेब्स हेल्थ केअर सोल्युशन्सचे मुख्यालय कॅलिफोर्नियात मेरिलँड येथे असून नवी मुंबईत एेरोली व फिलिपाइन्सच्या मनिला येथे कंपनीची डिलिव्हरी सेंटर्स आहेत. 

जगभरात ४ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. विस्तारात कंपनीने टियर-२ प्रकारातील औरंगाबादचा विचार केला. चिकलठाणा एमआयडीसीत सेक्टर-ईमधील गोल्डन आयटी बिझनेस पार्कमध्ये चौथे डिलिव्हरी सेंटर सुरू केले. या सेंटरवर ५६० वर्क स्टेशन्स आणि ३ ट्रेनिंग रूम्स  आहेत.  
 
फार्मा पदवीधारकांना संधी  
गेब्समध्ये फार्मास्युटिकल्स, नर्सिंग आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित पदवीधरांना रोजगाराची संधी आहे. कंपनीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात शहरातील फार्मा कॉलेजमधील १३० बीफार्म आणि एमफार्म पदवीधारकांची निवड केली. त्यांना ३ महिन्यांचे इन्शुरन्स बिलिंग आणि मेडिकल कोडिंगचे तांत्रिक प्रशिक्षण दिले.  यशस्वी प्रशिक्षणार्थींना अमेरिकन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल कोडर्स प्रमाणपत्र मिळाले. औरंगाबादसह मराठवाडा, जळगाव आणि अहमदनगरच्या तरुणांसाठी ही मोठी संधी ठरेल.
 
बातम्या आणखी आहेत...