आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: गजानन चौधरी मृत्यूप्रकरण; महसुल कर्मचारी संघटना करणार काम बंद आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गजाजन चौधरी यांच्या मृत्यूवरुन महसुल कर्मचारी संघटना आणि जिल्हाधिकारी यांच्यातला वाद समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसात चौकशी करुन विभागीय आयुक्तांना अहवाल देणार असल्याचे सांगितले होते. त्यावर महसुल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्याच्याच बदलीची मागणी केली असतांना त्या चौकशी कशी करत आहेत असा आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे १४ मार्चपासून महसुल कर्मचारी आणि मराठवाड्यातील नायब तहसीलदार मागण्या मान्य होईपर्यत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे यांनी दिली आहे.

गौणखनिज विभागातील गजानन चौधरी यांच्या मृत्यूनंतर सर्व महसुल कर्मचारी संघटना आणि नायब तहसीलदारांनी १० मार्चला मराठवाड्यात काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी अप्पर विभागीय आयुक्तामार्फत सदर घटनेची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे कळवल्यानंतर महसुल कर्मचारी संघटनेने आक्रमक पवीत्रा घेतला आहे.

प्रशासनात समन्वय नसल्याचा संघटनेचा आरोप
चौधरी मृत्यू प्रकरणात अप्पर आयुक्तमार्फत चौकशी करण्यात येत असतांना जिल्हाधिकारी निधी पांडे याची चौकशी का करतात ही बाब अनाकलणीय असल्याचे सांगत संघटनेने त्यांच्या चौकशीला आक्षेप घेतला आहे. चौधरी मृत्यूप्रकरणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या जबाबदार असणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणे आणि जिल्हाधिकाऱ्याची बदली करणे या मागणीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महसुल कर्मचारी नायब तहसीलदार १४ मार्चपासून मागण्या  मान्य होईपर्यत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डी.एम.देशपांडे,मराठवाडा उपाध्यक्ष संतोष अनर्थे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...