आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम रखडल्याने गजानन मंदिर ते पुंडलिकनगर रस्ता ‘खड्ड्यात’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गजानन महाराज मंदिर परिसरातील भाजीमंडई ते पुंडलिकनगर पुढे थेट जयभवानीनगराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. पुंडलिकनगरहून गजानन मंदिराकडे जाणारा एका बाजूचा रस्ता सिमेंटचा झाला; परंतु पतियाळा बँकेच्या समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुंडलिकनगर चौकात बुधवारी वाळूच्या हायवा ट्रकने दिलेल्या धडकेत नेहा जोशी या गंभीर जखमी झाल्या. या अपघातामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले. खराब रस्ते आणि अवैध वाहतूक अाणखी किती जणांना अपंग करणार, असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.
रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालवणे अशक्य झाले आहेत. त्यामुळे पुंडलिकनगर भागाकडे जाणारी वाहने उलट दिशेने पतियाळा बँकेच्या सिमेंट रस्त्यावरून जातात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्यारून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. दहा हजारांहून अधिक रहिवासी या भागात राहतात. रस्त्याचे काम रखडल्याने पुंडलिकनगर चौकापर्यंत शंभरहून अधिक मोठे खड्डे आहेत. पावसामुळे या खड्ड्यांचा आकार वाढत असून पाणी साचून राहत असल्याने त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने आदळून अपघात होत आहेत. यामुळे वाहनांचे तर नुकसान होत आहेच, शिवाय धक्का बसून पाठीच्या मणक्याचे आजार होत आहेत. या भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करा, अशी मागणी राजेंद्र साळवे, सचिन जोशी यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.

आठ दिवसांत काम सुरू
^या रस्त्यावर भूमिगत गटार योजनेचे काम चालू असल्यामुळे काम अधर्वट झाले. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल. -प्रमोद राठोड, उपमहापौर.
बातम्या आणखी आहेत...