आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांच्या नातेवाइकांना फसवणाऱ्याला चोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रुग्णाच्या नातेवाइकांना गोळ्या-औषधीच्या नावाखाली फसवणाऱ्या भामट्याला मंगळवारी लोकांनी घाटी रुग्णालयात चोप दिला. मंगेश थोरात (रा. एकतानगर) असे तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध बेगमपुरा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सिल्लोड तालुक्यातील कायगावातील सुखबाई साहेबराव शेजवळ या त्यांच्या नातीला प्रसूतीसाठी दोन दिवसांपूर्वी घाटीत घेऊन आल्या होत्या. दरम्यान प्रसूतिगृहाच्या बाहेर घाटीतील एक कर्मचारी म्हणून उभ्या असलेल्या एका व्यक्तीने डॉक्टरांनी गोळ्या- औषध लिहून दिल्या आहेत. ते लवकर अाणायचे आहे अशी बतावणी करत एका भामट्याने पाचशे रुपये लांबवले. बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. जवळचे पैसे संपले आणि औषधीही आली नाही म्हणून सखुबाई चिंतेत होत्या, अखेर त्यांनी पदर पसरून पैसे गोळा करून औषध आणले. दुसऱ्या दिवशी भामटा सखुबाईला दिसला, त्यांनी त्याला पकडून चोप देण्यास सुरुवात केली. काही बघ्यांनीही आपले हात मोकळे करून घेतले. लोकांनी त्याला घाटीतील चौकीत हजर केले. आठ दिवसांपूर्वी प्रसूतिगृहासमोरच एका रुग्णाला कृत्रिम श्वासाेच्छ्वास देण्यात आला होता. त्यांना अन्न देण्यासाठी घाटीतील डॉक्टरांनी अम्बलिकल लाइन (बेंबीद्वारे पोटात अन्न पोहाेचवण्यासाठीची नळी) मागितली होती; पण ती घाटीच्या लॅबमध्ये उपलब्ध नव्हती. नातेवाइकांनी रात्री दोन वाजेपर्यंत अनेक मेडिकलवर विचारणा केली असता, ती मिळाली नाही. एका खासगी रुग्णालयात मिळाली पण तोपर्यंत उशीर झाला होता. आईचे दूध किंवा अन्न मिळाल्यामुळे बाळ गतप्राण झाले.

एजंटांचा सुळसुळाट
औषधी आणून देतो म्हणून रुग्णांच्या नातेवाइकांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. काही एजंट चढ्या भावाने औषधी मिळवून देतात. यामागे एजंटांना कमिशन मिळते, अशी माहिती सूत्राने दिले.

कर्मचाऱ्यांची एजंटांना मदत
नुकत्याच आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत एजंटांचा विषय मांडला होता. मात्र, प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. घाटीतील काही कर्मचारी या एजंटांना मदत करतात, असे निर्दशनास आले आहे. -किरण गणोरे, सदस्य, अभ्यागत समिती.
बातम्या आणखी आहेत...