आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gandhi Road At Night Girl Out To Play, Argue Two Groups

गांधी रोडवर रात्री युवतीची काढली छेड, दोन गटांमध्ये वादावादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकयुवती तिच्या भावासोबत गांधी रोडवरून जात असताना सिमरन नावाच्या युवकाने तिची छेड काढली. ही घटना रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. युवतीच्या भावाने त्या युवकाला जाब विचारला असता, त्याने त्याच्या दहा ते पंधरा मित्रांना बोलावले. युवतीच्या भावानेही त्याच्या दहा ते पंधरा मित्रांना बोलावून घेतले. दोन्ही गटांत घटनास्थळावर वादावादी झाली.
हा प्रकार सुरू असतानाच सिटी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन दोन्ही गटातील युवकांना सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.