आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक रुपयाचीही वर्गणी न घेता लाखो रुपयांचे सेवाकार्य करणारे गांधीनगर गणेश मंडळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर गणेश मंडळातर्फे आयोजित पारंपरिक खेळ. - Divya Marathi
गांधीनगर गणेश मंडळातर्फे आयोजित पारंपरिक खेळ.
औरंगाबाद - बन्सीलाल नगरातील ११६ बंगल्यांची वसाहत गांधीनगर येथील गणेश मंडळ एक रुपयाचीही वर्गणी मागता सामाजिक भान जपत गणेशोत्सव साजरा करत आहे. उद्योजक, साहित्यिक, व्यावसायिक, सीए अशा उच्चभ्रू वस्तीतील हे मंडळ सार्वजनिक जागा अडवता एकेकाच्या घरात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना होते. तज्ज्ञांचे व्याख्यान आणि पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते. लाखभर रुपये खर्चून गरजंूची नेत्र आणि दंत तपासणी, चष्मे, शैक्षणिक साहित्याचे वाटप, घरेलू कामगारांचा विमा तसेच वृक्षारोपण केले जाते.
 
बन्सीलालन गरातील गांधीनगरमध्ये साहित्यिक, उद्योजक, डॉक्टर, वकील, सीए असे सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोक राहतात. पूर्वी येथेही गणेशोत्सवाचा धडाका असायचा. वर्गणी मागितली जायची. मात्र, सीए राजेंद्र झंवर यांनी १० वर्षांपूर्वी कॉलनीवासीयांना गणेशोत्सवाला सामाजिक अधिष्ठान देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास विष्णुदास बजाज, रतनसी पटेल, राजेंद्र शहा, आशिष भारुका, आरती दर्डा, राजवी पटेल, शोभा पटेल, प्रतिभा झंवर, बिना पटेल, आशिष बाफना यांनी समर्थन दिले. यात पहिली अट वर्गणी मागणे हीच होती. खर्च टाळण्यापेक्षा कमीत कमी खर्च करण्याचे ठरले. मोठी मूर्ती आणता शाडूची छोटी मूर्ती आणली जाऊ लागली. वर्षे नागरिकांनी मूर्ती बनवली. सार्वजनिक जागेत गणपती बसवता एकेका सदस्याच्या घराच्या मोकळ्या जागेत बाप्पाची स्थापना होऊ लागली. उर्वरितपान.६
 
सामाजिक भान जपणारा उत्सव
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सामाजिक जाणिवा निर्माण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक केले. आम्ही उत्सवाचे पावित्र्य जपत यास इव्हंेट होण्यापासून टाळत आहोत. मोठा बडेजाव करण्याचे सोडून आम्ही गणेशोत्सवातून आपले संस्कार,परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय. गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे. 
- सीए राजेंद्र झंवर, गांधीनगर गणेश मंडळ, बन्सीलालनगर
 
बातम्या आणखी आहेत...