औरंगाबाद- बहादूरपुरा,गांधीनगर येथील रहिवासी सखाराम घुले यांच्या पत्नी शारदा घुले (२७) आपल्या वर्षांच्या मुलासह (शैलेश) १५ जुलै रोजी घरातून निघून गेल्या असून अद्याप परतलेल्या नाहीत. त्यांचा रंग सावळा, गोल चेहरा, पाच फूट उंची असून लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे. यासंदर्भात त्यांच्या पतीने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आढळल्यास कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंगुरीबागभागातून तरुण बेपत्ता : अंगुरीबागयेथील रहिवासी बाबूअप्पा मेने यांचा मुलगा महेश मेने (३८) हा १२ जुलै रोजी घरातून निघून गेला आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार महेश हे मनोरुग्ण असून उंची पाच फूट, मध्यम बांधा, सावळा रंग, राखाडी रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगावजिल्ह्यातील महिला औरंगाबादच्या बसस्थानकावरून बेपत्ता : भवानीनगरयेथील रहिवासी गजानन बसैये यांची आई शोभा बसैये (५५) या सामरोद, ता. जामनेर येथून औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात आल्या होत्या. त्या अद्याप घरी आलेल्या नाहीत. त्यांचा रंग गोरा, पाच फूट उंची, सडपातळ बांधा, उजवा हात उजवा पाय अपंग असून क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शोभा बसैये
महेश मेने
शैलेश घुले
शारदा घुले