आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीएनए’मुळे पटली शहिदाची ओळख; शहीद गणेश अहिरराव यांना औरंभाबादेत अभिवादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उत्तराखंडमध्ये बचाव पथकाचे हेलिकॉप्टर कोसळून शहीद झालेले जळगावचे गणेश हनुमंत अहिरराव यांचे पार्थिव ओळखणे शक्य झाले नाही. त्यामुळे न्यायवैद्यक पथकाने जळगाव येथून त्यांच्या आई-वडिलांचे नमुने घेऊन डीएनए चाचणी केली आणि त्यानंतरच मृतदेहाची ओळख पटली. या प्रक्रियेमुळेच पार्थिव ताब्यात घेण्यास विलंब झाला. गणेश यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी विमानाने औरंगाबाद विमानतळावर आले. तेथे प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पार्थिव अंतिम संस्कारासाठी जळगावला पाठवण्यात आले.

शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, राष्ट्रीय आपत्ती मदत दलाचे (एनडीआरएफ) कमांडर आलोक अवस्थी, पोलिस आयुक्त संजयकुमार, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे, तहसीलदार विजय राऊत यांनी प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर गणेश यांचे पार्थिव जळगावकडे रवाना झाले.

एनडीआरएफचे जवान सोबत
गणेश यांच्या पार्थिवासोबत एनडीआरएफचे जवान होते. विमानतळावर पार्थिव ताब्यात घेतल्यानंतर एका मोटारीतून शववाहिनीसोबत हे जवानही जळगावकडे रवाना झाले.