आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील देखाव्यांतून उमटले सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सलगतीन वर्षांच्या दुष्काळानंतर या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिकही हरखून गेले आहेत. त्यातच सणावारांमुळे आनंदीआनंद आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. माहेरी आलेल्या गौरींनाही नुकताच िनरोप देण्यात आला. आता गणेशभक्तांची पावले शहरातील सार्वजनिक गणपती मंडळानी साकारलेले देखावे पाहण्यासाठी पडत आहे. जलसंवर्धन, बेटी बचाओ, धार्मिक अाख्यायिका आणि जंगल बुक अशा विविध विषयांवर साकारण्यात आलेले देखावे गणेशभक्तांच्या पसंतीस पडत आहेत.
राजा बाजार, दिवाण देवडी, गांधी पुतळा, सराफा गल्ली, जाधवमंडी यथे दरवर्षी विविध विषयांवर सुरेख देखावे सादर करण्यात आले आहेत. टीव्ही सेंटर, चिकलठाणा, सिडको, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी येथेही आकर्षक रोषणाई, सामाजिक विषयांवरील सजीव निर्जीव देखाव्यातून विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गौरी विसर्जनाची शनिवारची सुटी, रविवार आणि सोमवारची बकरी ईदची सुटी अशा सलग तीन सुट्यांचा आनंद नागरिक लुटत आहेत. शेवटच्या दिवसांत देखावा पाहण्यासाठी

मुलांना सांभाळा
गर्दीत भाविकांनी आपली मुले सांभाळण्याचे आवाहन पोलिस संघटनांनी केले आहे. मुलाच्या खिशात त्याचे नाव आणि वडीलधाऱ्यांचा मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी टाकल्यास मूल हरवलेच तर ते पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांना मदत होईल.

देखाव्यांसाठी स्पर्धा
या वेळी महाराष्ट्र शासनाने बेटी बचाओ, जलसंवर्धन, स्वदेशीचा पुढाकार या विषयांवर साकारलेल्या देखाव्यांना दहा लाखांपर्यंतची बक्षिसे जाहीर केली आहे. तर गणेश महासंघ आणि पोलिस प्रशासनाकडून विघ्नहर्ता पारितोषिकांसाठीदेखील परीक्षण होणार आहे.

असे पाहता येतील देखावे
देखावे पाहण्यासाठी जाताना प्रथम खडकेश्वर येथील बजाज कामगारांनी साकारलेला देखावा पाहून औरंगपुरामार्गे नाथ सुपर मार्केटजवळील पार्किंगमध्ये गाडी लावू शकता. जिल्हा परिषद मैदानावर गाडी लावता येईल. गुलमंडी, सराफा गल्लीतील गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर गांधी पुतळामार्गे राजा बाजार जाधवमंडी या भागातील गणपती पाहत पुन्हा औरंगपुरा भागात येता येईल.
बातम्या आणखी आहेत...