आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सवा निमित्तगणेश मंडळांना परवानगी घेण्यासाठी होणारा त्रास वाचावा यासाठी शांतता समितीच्या बैठकीत सर्व राजकीय पक्ष, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक खिडकी योजना चालू करण्याची मागणी मान्य करण्यात आली. महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ, धर्मादाय आयुक्त कार्यालये पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. मंगळवार ते ११ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते दरम्यान पोलिस आयुक्तालयाच्या अलंकार सभागृहात परवानगीसाठी अर्ज सादर करता येतील.

पोलिस आयुक्तांनी बाेलावलेली शांतता समितीची बैठक सोमवारी तापडिया नाट्यगृहात झाली. या वेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील, अतुल सावे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी गणेश मंडळाला परवानगी घेता गणपती बसवू देण्याची मागणी तारा पान सेंटरचे शरफूभाई यांनी केली. या वेळी पोलिस आयुक्तांनी असे चालणार नाही, असे ठणकावून सांगितले. सर्वच गणेश मंडळांना परवानगी घ्यावी लागणार, असे सांगितले. अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी राजकीय पक्षांचे लोकही आड आले तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी केली. बकरी ईद गणेशोत्सवादरम्यान २५ तारखेला आहे. यासाठी जनावरांची ने -आण होणार आहे. त्यावेळी जनावरे नेणाऱ्या गाड्या पोलिसांनी पकडू नयेत, अशा सूचना पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्याला कराव्यात, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी केली.

तेच नेते, तेच सदस्य
गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस आयुक्तांकडून होणाऱ्या बैठकीत तेच नेते आणि तेच सदस्य असतात. शहरात १५०० पेक्षा अधिक गणेश मंडळे आहेत. त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही म्हणून अशी बैठक बोलावली जाते. मात्र त्यास मोजकेच पदाधिकारी उपस्थित असतात. पोलिसांच्या जनसंपर्क विभागाला प्रसारमाध्यमांपर्यंतच बैठकीची माहिती पोहोचवता येत नसेल तर ती गणेश मंडळापर्यंत कधी पोहोचतील, अशी शंकाही काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सोमवारी तापडिया नाट्यगृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना पोलिस आयुक्त अमितेशकुमार. व्यासपीठावर मान्यवर.