आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडीचशे अर्जांचे वाटप, गणेश मंडळ अाभारी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे आठच दिवस उरले असल्याने बाजारात लगबग सुरू झाली आहे. गणेश मंडळांनी विविध परवानग्या घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्तांनी या परवानग्या एकाच खिडकीतून देण्याची नवी पद्धत अवलंबली अाहे. या कार्यालयात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे पथक, महानगरपालिकेतील सहा वॉर्डांचे प्रत्येकी एक पथक, एमएसईबीचे एक पथक आणि शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याचे एक पथक बसत आहे. सगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळत असल्याने "मंडळ आभारी' आहे, असे वातावरण आहे.
आठ सप्टेंबरपासून मंडळांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कालपर्यंत पोलिस प्रशासनाकडून २५० अर्जांचे वाटप करण्यात आले होते. पोलिस आयुक्तालयात धर्मादाय आयुक्तालयातर्फे ललिता थोरात, तेजराव तायडे, अजित पाटील, उमेश देशमुख, मोनिका शेळके, सुनील रिंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएसईबीतर्फे सहायक अभियंता एफ. के. सिद्दिकी, कनिष्ठ अभियंता पी. एस. पाटील, किशोर तिळवे, उल्हास देशपांडे, पांडुरंग बोडखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या वॉर्ड अ, ब, क, ड, आणि च्या प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी १२ वाजेपासून या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील २५० गणेश मंडळांनी अर्ज नेले असून त्यातील फक्त तीनच मंडळांनी बुधवारी आवश्यक ती कागदपत्रे जमा करून परवानग्या मिळवल्या आहेत.

{धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून दोन दिवसांत एकूण १५७ अर्जांची विक्री करण्यात आली असून १२१ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
{मनपा कडूनवॉर्ड‘अ’मध्ये ७, ‘ब’मध्ये १२, ‘क’मध्ये ४, "ड’मध्ये ६, "ई’मध्ये २३ आणि "फ’मध्ये सातारा-देवळाईसह एकूण १२ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

परवानग्यांसाठी खर्च वाढला
मागील वर्षापर्यंत पोलिस प्रशासन, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि इतर परवानग्यांसाठी ५६० रुपये लागत होते; पण या वर्षी चार हजार रुपये लागत असल्याने काही गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शहरातील काही गणेश मंडळांनी या वर्षीचा दुष्काळ पाहता वर्गणी जमा करण्याचे ठरवले आहे, पण परंपरा टिकवण्यासाठी गणपती बसवले जाणार आहेत.