आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणवाडीत ७ क्विंटल शाडूचा ११ फुटी मयूरेश्वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोकणवाडीतील सिद्धिविनायक गणेश मंडळाने शहरातील सर्वात मोठ्या ११ फुटांच्या शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जावी यासाठी "दिव्य मराठी'ने जनजागरण मोहीम हाती घेतली.
कोकणवाडीतील सिद्धिविनायक गणेश मंडळाने यंदा शाडूची गणेशमूर्ती स्थापन केली आहे. ११ फूट उंचीची ही मूर्ती शहरातील शाडूची सर्वात मोठी मूर्ती आहे. या संदर्भात मंडळाचे संस्थापक व स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे यांनी सांगितले की, यंदा प्लास्टर आॅफ पॅिरसची मूर्ती स्थापन करण्याऐवजी शाडू मातीची पर्यावरणपूरक मूर्ती स्थापन करण्याचा मंडळाने विचार केला. त्यानंतर मोठ्यात मोठी शाडूची मूर्ती कोठे मिळेल याचा शोध घेतल्यावर नगर येथील मोरे आर्ट्स यांचे नाव समोर आले. गेल्या महिन्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन मूर्ती निश्चित केली.
वाघचौरे म्हणाले की, मयूरेश्वराच्या रूपातील ११ फूट उंचीची ही रेखीव मूर्ती भरीव आहे. या मूर्तीचे वजन सात क्विंटल असून ती नगरहून औरंगाबादला आणताना अतिशय काळजी घ्यावी लागली. नगर ते औरंगाबाद या १२० किमीच्या प्रवासात मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती सांभाळत होते. ही मूर्ती जरी ३१ हजार रुपयांची असली तरी तिच्या वाहतुकीवर बराच खर्च करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या मंडपात या देखण्या गणरायाची स्थापना करण्यात आली.