आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याविषयी जनजागृती, विविध गणेश मंडळांमध्ये एक लाख पत्रकांचे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; पाणीहे जीवन आहे. दुष्काळागत स्थिती झालेल्या मराठवाड्याला नुकत्याच झालेल्या पावसाने तारले. परंतु ही तात्पुरती सोय झाली आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी आहे त्या पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. नवीन स्रोतही निर्माण करावे लागतील. पाण्याचा थेंबन् थेंब वाचवण्यासाठी स्वत:पासून बचतीची सवय लावावी लागेल, असा संदेश देत कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत सात मित्र गणेशोत्सव साजरा करत आहेत.

सचिन जोशी, ऋतुपर्ण कुलकर्णी, गोविंद देशटवार, योगेश भोसले, राहुल डोके, विद्या जोशी आणि डॉ. ज्ञानेश्वर देशटवार हे मित्र आयसीआयसीआय बँकेत काम करताना एकत्र आले. नंतर प्रत्येकाचे क्षेत्र बदलले. काहींनी बँक बदलली, तर काहींनी बँकिंग सोडून दुसरे क्षेत्र निवडले. मात्र, समाजात भोवताली घडणाऱ्या घटनांबाबत संवेदनशीलता हा त्यांच्यातील समान धागा त्यांना एकत्र बांधून आहे. गेले वर्षभर ते चैतन्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोलिसांसाठी संवादकौशल्य आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, पोलिसांच्या मुलांसाठी करिअर गाइडन्स, रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम आयोजित करत आले आहेत. समाजातील विविध प्रश्नांवर जनजागरण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मोठी पर्वणी असते. ही बाब ओळखून त्यांनी पाणीबचतीचे महत्त्व हा विषय घेऊन प्रबोधन करण्याचे ठरवले.

गणेशोत्सवात कॉर्पोरेट मित्रांचे पाणी बचतीविषयी प्रबोधन
पाणी नसल्याने नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपण शहरी भागात राहत असलो तरी ग्रामीण भागाविषयी संवेदनशीलता आवश्यक आहे. एकीकडे भीषण टंचाई, तर दुसरीकडे नासाडी असे चित्र आहे. यामुळेच आम्ही या उपक्रमातून पाणी बचतीचे सोपे उपाय सांगत आहोत. भूजल पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा रामबाण उपाय आहे हे पटवून सांगतोय. सचिनजोशी, मोटिव्हेशनल अँड लँग्वेज ट्रेनर

रोज मंडळात वितरण
हेमित्र दररोज एका गणेश मंडळाबाहेर उभे राहून या पत्रकांचे वितरण करत आहेत. केवळ भाविकांच्या हातात पत्रक देता त्याचे महत्त्व समजावून सांगतात. संधी मिळाली तर मंडळाच्या व्यासपीठावरूनही हा संदेश देण्याची त्यांची तयारी आहे. दहा दिवसांत एक लाख पत्रके वाटण्याचा त्यांचा संकल्प आहे. हे करतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबतही ते माहिती देत अाहेत.

ही आपली जबाबदारी
चित्रांच्या माध्यमातून प्रबोधन
गणेशभक्तांशीसंवाद साधण्याबरोबरच छापील ब्रोशर वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पत्रक तयार केले. यात पाण्याचे महत्त्व सांगणारे दोन दृष्टिकोन मांडण्यात आले अाहेत. पहिल्या दृष्टिकोनात आपण पाण्याची नासाडी कशी करतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पाण्याची नासाडीमुळे भविष्यात भोगावे लागणारे परिणामही सांगितले आहे. दुसऱ्या पानावर पाण्याची बचत करण्यासाठीचे उपाय सांगण्यात आले आहेत. शॉवरचा वापर टाळणे, शेव्हिंग करताना बेसिनचा नळ बंद ठेवणे, वॉशिंग मशीनचा कमी वापर करणे अशा विविध बाबी समजावून सांगण्यात आल्या आहेत.