आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या ‘वीकेंड'ला मध्यरात्रीपर्यंत देखावे, शेवटचे चार िदवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकही राहतील सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सवाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्याची परवानगी जिल्हािधकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पुढच्या शनिवारी आिण रविवारी रात्री उशिरापर्यंत गणपती देखावे पाहण्याचा आनंद औरंगाबादकरांना घेता येणार आहे.
गणपती उत्सवाच्या काळात सलग चर दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरायला परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यािचका करण्यात आली होती. त्यावर सुनावणीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तशी परवानगी देणारे पत्रच न्यायालयात सादर केले. त्यामुळे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी ही जनहित याचिका निकाली काढली.
जिल्हाधिकारी वर्षभरात पंधरा दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्याची मुभा देऊ शकतात. यात शिवजयंती, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, ३१ डिसेंबर, अष्टमी व नवमी, गणेशोत्सवात चार दिवस व दोन दिवस स्थानिक कार्यक्रमांसाठी ही मुभा देता येते. पूर्वी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी, गौरी विसर्जन, गणेश विसर्जनावेळीच रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवता येत होते.
सलग चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना २०११ मध्ये निवेदन दिले. परवानगी न मिळाल्याने त्यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. खंडपीठाने निर्णय घेण्याचे आदेश प्रशासनास दिले, परंतु निर्णय न झाल्याने पाटील यांनी २०१४ मध्येही प्रशासनाला मागणी केली. तीही मान्य न झाल्याने त्यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. याचिका २६ ऑगस्टला सुनावणीस आली असता खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे मागवले होते. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी परवानगी दिली.
एक दिवस दिला वाढवून
गणेशोत्सवात तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्याची परवानगी होती. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असल्याने त्यांनी आणखी एक दिवस अधिक वाढवून दिला. शासनाच्या वतीने सरकारी वकील सुनील कुरुंदकर यांनी काम पाहिले.
२२०० मंडळांची धर्मादायकडे नोंदणी
धर्मादाय विभागाकडे जिल्ह्यातील २२०१ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. अशा नोंदणीकृत गणेश मंडळांनाच वर्गणी गोळा करण्याचे अधिकार आहेत. आैरंगाबाद शहर व तालुक्यातून सर्वाधिक १५०९ मंडळांची नोंदणी झाली आहे. पैठण १५९, सिल्लोड ५५, सोयगाव ३, गंगापूर २०९, फुलंब्री ६८, कन्नड १२३, वैजापूर १३ व खुलताबाद ६२ अशी नोंदणी झाली.