आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाडूचे ५५ हजार बाप्पा विराजमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिमाखदार सलामी देत गणरायाचे आगमन झाले. गणेशाच्या स्वागताला पावसानेही अावर्जून हजेरी लावली. एरवी सायंकाळी बरसणारा पाऊस आज सकाळपासूनच ब्रेक घेत घेत हजेरी लावून होता. गणपती बाप्पाचा गजर आसमंत दुमदुमून गेला. अाबालवृद्धांमध्येही जल्लोष भरला होता. शहरातील सर्वच बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या हाेत्या. पर्यावरणपूरकतेचा जागर झाल्याने यंदा घराघरातून शाडू मातीच्या गणेशमूर्ती विराजमान झाल्या. शहरात जवळपास ५५ हजार कुटुंबांनी शाडू मातीपासून निर्मिलेल्या पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केली. यामध्ये ३५ हजार गणेशमूर्ती स्वत: घडवलेल्या होत्या, तर इतर िठकाणी जवळपास २० हजार गणेशमूर्ती िवकत घेण्यात आल्या.
विविध सोसायट्या, हॉिस्पटल्स, होस्टेल्स, बाजारपेठा, व्यापारी संकुलांतून गणेशाच्या स्थापनेला उधाण आले होते. पूजेचे साहित्य, गणेशमूर्तींनी परिसर गजबजला होता. त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज मंदिर, शिवाजीनगर, उस्मानपुरा, औरंगपुरा, िजल्हा परिषद मैदान, टी. व्ही. सेंटर, मुकुंदवाडीच्या सर्वच वसाहतींतून सकाळी ६ वाजेपासूनच गणेशमूर्तींची दालने सजली होती. यासोबतच सजावटीचे साहित्यही सर्वांना आकर्षित करत होते.
तरुणाईचा उत्साह दांडगा
तरुण मंडळी ढोल-ताशांच्या गजरात गणेशाचे स्वागत करण्यासाठी आधीपासूनच सज्ज होती. जिल्हा परिषदेच्या मैदानावर गटागटाने लोक हातगाड्यांवर मोठ्या गणेशमूर्ती, तर कारमध्ये लहान आकारांच्या घरगुती स्थापनेच्या गणेशमूर्ती घेऊन जात होते. ढोल-ताशांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
शाळांतील कार्यशाळांतून ३५ हजारांवर गणेशमू्र्तींची िनर्मिती
शहरातील विविध शाळांमधून पर्यावरणवादी संस्थांनी घेतलेल्या कार्यशाळांमध्ये ३५ हजारांपेक्षा अधिक गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात अाली. मोरया फाउंडेशन, विविध महिला बचत गट, लायन्स क्लब, रोटरी क्लब, दीपशिखा फाउंडेशन यांच्या माध्यमातून या कार्यशाळा घेण्यात आल्या.

सौंदर्य आणि पर्यावरण जागरणामुळे मागणी वाढली
यंदा आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला पहिली पसंती दिली. शाळांतून, महिला मंडळांतून आणि सोसायट्यांतून झालेली पर्यावरण जनजागृती यासाठी पूरक ठरली. यंदा ३५० गणेशमूर्तींची विक्री झाली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा या मूर्ती कितीतरी अधिक सुबक, आकर्षक आहेत. गेल्या ५ वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करतो. यंदा शाडू मातीला प्रचंड मागणी आहे.
प्रकाश मुळे, विक्रेते ज्योतीनगर
आमच्याकडील सर्व मूर्ती संपल्या
यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. सकाळपासून २२० मूर्तींची विक्री झाली. यामध्ये जनजागृतीचा खूप मोठा हात आहे. शिवाय शाळांच्या स्तरावर झालेली जनजागृती पुढील अनेक वर्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
रवींद्र महाजन, गणेशमूर्ती विक्रेते, ज्योतीनगर
मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशाकडे केली पाठ
शाडू मातीपासून निर्माण केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा अधिक महाग असतात. त्यामुळे वर्गणीतून उभारल्या जाणाऱ्या गणेश मंडळांना शाडू मातीच्या मूर्तींचा खर्च पेलवत नाही.
सुबोध जगताप, गणेशमूर्ती विक्रेता, जिल्हा परिषद मैदान
पर्यावरणपूरक गणेशाचा गजर
आम्ही यंदा आवर्जुन पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. शाळांतून मुलांमध्येही याविषयी जागृती झाली. पर्यावरणाला हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून तर हे महत्त्वाचे होतेच पण धािर्मक भावना जपण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे होते. कारण विसर्जनप्रसंगी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. अर्धभग्न अवस्थेतील मूर्ती पुढे अनेक दिवस तशाच राहतात. त्यातून धािर्मक भावना दुखावतात. जलप्रदूषणही होते. -कांचन सोनी, माजी अध्यक्षा माहेश्वरी बहू मंडळ
महत्त्वाची चौकट
कागदापासून बनविलेल्या १ हजार मूर्तींची विक्री

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उत्साह शहरात सर्वत्र दिसून आला. आमच्याकडे असलेल्या १००० कागदी लगद्यापासून बनविलेल्या गणेशमूर्ती विकल्या गेल्या. मागणी अधिक होती मात्र यंदा तेवढ्या मूर्ती घडविणे शक्य झाले नाही. -सायली डबीर, अनिरुद्ध बापू फाउंडेशन
शाडू मातीच्या मूर्तींना पसंती
आम्ही गेल्या ६ वर्षांपासून शाडूचा गणपती आणून त्यावर स्वत: रंगकाम करतो. गेल्या वर्षी ८०० मूर्तींची विक्री झाली. यंदा १२०० गणपती आमच्याकडून गेले. यामध्ये ४ इंचांपासून २ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती होत्या. या वेळी जनजागृतीमुळे प्रत्येकाने शाडू गणेशाची आधी मागणी केली.
पुरुषोत्तम डकले, गणेशमूर्ती विक्रेते, उल्कानगरी
यंदा ७३०० मूर्ती घडवल्या
आम्ही गेल्या वर्षी गणेशमूर्ती प्रशिक्षण सुरू केले तेव्हा ४ हजार गणेशमूर्ती घडवल्या होत्या आणि २५० मूर्तींची विक्री केली होती, तर यंदा ७३०० गणपती बनवण्यात आले, तर ७०० गणेशमूर्तींची आम्ही विक्री केली. ४ इंचांपासून पावणेतीन फुटांपर्यंतचे गणेशमूर्ती आम्ही शाडू मातीत घडवले होते.
प्रभू इंगळे, मोरया फाउंडेशन