आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी ७३३ गुन्हेगारांवर कारवाई होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सोमवारपासून सुरू होणारा गणपती उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन येत्या दोन दिवसांत रेकॉर्डवरील ७३३ अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करणार आहे. तसेच उपद्रवी ५३ गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या विविध धार्मिक उत्सवांदरम्यान शहरात शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दोन महिन्यांत इसिसचे संशयित अटक करण्यात आल्याने पोलिसांनी सुरक्षेसाठी शहरात गस्त वाढवली आहे. गणेशोत्सवात १६०० च्या वर पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी दक्ष राहतील. रेकॉर्डवर असलेल्या ७३३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून ५३ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी ११६८ गणेश मंडळांची नोंदणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. यंदा यात वाढ होऊन १२७० मंडळांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा होत असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा चोवीस तास तैनात असेल. सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात आली असून आवश्यक दल कर्मचारी नेमण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त संदीप आटाेळे राहुल श्रीरामे यांनी सांगितले.
कडा मैदानावर शुक्रवारपर्यंत ५५ स्टॉल मांडण्यात आले. एका स्टॉलसाठी सात हजार रुपये, तर मोकळ्या आठ बाय दहाच्या जागेसाठी एक हजार रुपये आकारले जात आहेत.

गजानन मंदिर रस्त्याचा निर्णय धाब्यावर
शनिवारपासून नागरिक गणपती बाप्पाची मूर्ती विकत घेण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावर असलेल्या मूर्ती विक्रेत्यांना पोलिस आयुक्तांनी कडा मैदानावर विक्री करण्याची सूचना केली होती. तेथे मूर्ती विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्थाही करण्यात आली, परंतु रस्त्याच्या कडेला ठाण मांडून असलेल्या विक्रेत्यांनी कडा मैदानावर स्थलांतर करता आहे त्याच ठिकाणी विक्री सुरू केली आहे. या रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असल्याने येत्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयुक्तांचे मार्गदर्शन
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरांची विभागणी करून पोलिस कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरातील अतिसंवेदनशील भागावर विशेष लक्ष दिले जाणार असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
बाहेरून मागवलेले अधिकारी, कर्मचारी

{७० पोलिस उपनिरीक्षक
{०३ शीघ्रदलाच्या कंपन्या
{०१ सहायक पोलिस आयुक्तांचा सुरक्षा पथकात समावेश
बातम्या आणखी आहेत...