आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव : उद्या ढोल पथक स्पर्धा, ‘दिव्य मराठी’चा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सव म्हणजे तरुणाईचा उसळता जल्लोष. हा जोश अधिक वाढविण्यासाठी यंदा ‘दिव्य मराठी’तर्फे ढोल पथक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, स्वाद व्हेज रेस्टॉरंटचे चिंतन शहा आणि ओरो कॅबचे जितू मोटवानी यांच्यासंयुक्त विद्यमाने होणारी सर्वोत्कृष्ट ढोल पथक स्पर्धा शनिवारी (१० सप्टेंबर) सकाळी ११ वाजेपासून प्रोझोन मॉलच्या प्रांगणात रंगणार आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम विजेत्या संघास २५००१ रुपये, द्वितीय १५००१ आणि तृतीय क्रमांकास ९९९९ रुपयांचे बक्षीस ‘दिव्य मराठी’कडून जाहीर करण्यात आले आहे.
गणेशोत्सव सुरू झाल्यापासूनच औरंगाबादच्या कानाकोपऱ्यात ढोल-ताशा पथकांच्या तालमींचे आवाज घुमू लागले आहेत. या पथकांच्या वादनात चुरस निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि नागरिकांनाही त्याचा आनंद घेता यावा, यासाठी ढोल पथक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला ढोल पथकेही पुरूषांच्या पथकांशी झुंजणार असल्याने चुरस वाढली आहे. सप्टेंबर रोजी उत्साहात झालेल्या रांगोळी आणि उखाने स्पर्धेनंतर यंदाच्या गणेशोत्सवातील स्पर्धांबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. हौशी औरंगाबादकरांना या स्पर्धेचा आनंद घेता यावा म्हणून ही स्पर्धा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जाधव मंडप डेकोरेटर्सचे रखमाजी जाधव, प्रोझोन मॉलचे मोहम्मद अर्शद, जितेंद्रसिंग सलूजा, तसेच एस.एस. प्रो आणि नॉर्थन प्रो लाइट्सचे प्रितम गोसावी यांचे सौजन्य लाभले आहे.

परीक्षक म्हणून धनंजय धुमाळ
ढोलपथक स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून नाशिक येथील संगीत दिग्दर्शक तथा स्वरांजली अकादमीचे प्राचार्य धनंजय धुमाळ हे असतील. त्यांना संगीत, वाद्य क्षेत्रातील तगडा अनुभव असून त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, नाटकांचे संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. सिनेमा, नाटक क्षेत्रातील दिग्दर्शन आणि लेखनाचा अनुभव असलेल्या धुमाळ यांना विविध नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धांचे परिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...