आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश मंदिराची दानपेटी पळवली,पाचव्यांदा घडला चोरीचा प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील गजबजलेल्या वस्तीतील २३ वर्षे जुन्या असलेल्या नारळीबागेतील पावन गणेश मंदिराची दानपेटी चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री पळवल्याची घटना घडली. विशेष म्हणजे चोरीची ही पाचवी घटना असूनदेखील या मंदिराच्या सुरक्षेचा कुठलाही बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

पावन गणेश मंदिराला लोखंडी गेट केले आहे. रात्री सुमारे बारापर्यंत येथे वर्दळ असते. मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असावी, असा अंदाज नागरिकांनी बांधला आहे. चोरट्यांनी मंदिरातील फरशीत बसवलेली दानपेटी पळवली, मात्र मूर्तीवरील चांदीच्या मुकुटाला हात लावला नाही. मंदिरासमोरच माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांचे संपर्क कार्यालय आहे. मंदिरात पोलिसांसाठी एक वही ठेवली आहे. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या वहीवर स्वाक्षरी करून परिस्थितीचा अहवाल लिहिणे अपेक्षित आहे. सहा महिन्यांपासून पोलिसांनी या डायरीत एकही स्वाक्षरी केली नसल्याचे समोर आले.

सीसीटीव्ही कॅमेरे हवेत : शिवसेना नेते बंडू ओक या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम पाहत असल्याचे पुजाऱ्याने सांगितले. मंदिराचे उत्पन्न मोजकेच असल्यामुळे व्यवस्थापन सीसीटीव्ही लावू शकत नसल्याचे पुढे आले आहे. आता मात्र सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशी मागणी जोर धारत आहे.

मंदिरात होणारे चोरीचे प्रकार कमी व्हावेत यासाठी सुरक्षेची चोख व्यवस्था होणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही मिळाल्यास मदत होईल व अनुचित प्रकार थांबतील. अशा घटना भाविकांच्या मनाला ठेच पोहोचवणाऱ्या आहेत.
नरेंद्र जोशी, पुजारी