आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप, राज्‍यात असा होता मिरवणूकांचा जल्‍लोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूरात मोठ्या थाटात गणेशोत्‍सवाच्‍या मिरवणूकी सुरू आहेत. - Divya Marathi
कोल्‍हापूरात मोठ्या थाटात गणेशोत्‍सवाच्‍या मिरवणूकी सुरू आहेत.
औरंगाबाद- गेल्‍या दहा दिवसांपासून राज्‍यात गणेशोत्‍सव मोठ्या धुमधडाक्‍यात सुरू आहे. मात्र, आज आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पांना निरोप देण्‍याचा दिवस असल्‍याने गणेश मंडळांच्‍या विसर्जन मिरवणूका निघाल्‍या आहेत. संपूर्ण राज्‍यात भक्‍तीमय वातावरणासह तरुणाईचा जल्‍लोष दिसून येत आहे. जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीनेे ठिकठिकाणी विसर्जन तळी तयार करण्‍यात आली आहेत. उत्‍सवाच्‍या काळात कोणताची अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त महानगरांमध्‍ये ठेवण्‍यात आला आहे. काही ठिकाणी निरीक्षण मनोरेही उभारण्‍यात येत आहेत.
राज्‍यात असा आहे मिरवणूकांचा जल्‍लोष..
औरंगाबाद- औरंगाबादमध्ये सकाळपासूनच गणेश विसर्जनाच्‍या मिरवणूकांना उत्‍साहात सुरूवात झाली आहे. बँड आणि डीजेच्‍या तालावर थिरकत तरूणाई लाडक्‍या बाप्‍पाला विसर्जनस्‍थळी नेत आहे. काही मंडळांच्‍या वतीने महाप्रसादाच्‍या कार्यक्रमाचे आयोजनही करण्‍यात आले आहे. सध्‍या पैठणगेट, औरंगपूरा, गुलमंडी, निराला बाजार या परिसरात वर्दळ असल्‍याचे पाहायला मिळत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूर- नागपूरातही सकाळपासून गणेशविसर्जनाची धूम पाहायला मिळत आहे. ढोल ताशांचे पथकं शहरातील चौक दणाणून सोडल आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांवर विसर्जन मिरवणुका पाहण्‍यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नागपूरच्या कोराडी तलावात गणपतीचे विसर्जन करण्‍यात येणार आहे; शिवाय विविध परिसरात विसर्जनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. विसर्जनस्‍थळी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त आहे. तुळशीबागेतून मिरवणूका सुरू झाल्‍या आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर- कोल्हापूरात मानाच्या तुकाराम माळी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदाही ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्ये मिरवणूकीत पाहायला मिळत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक निघाली.
---------------------------------------------------------------------------------------------------------
नाशिक- नाशिकमध्ये लहान मंडळं व घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात आहे. नाशिकच्या रस्त्या-रस्त्यावर मोठ्या भक्‍तीमय वातावरणात गणरायाला निरोप दिला जातोय. शिवाय पंचवटी, रविवार कारंजा चौकात चोख बंदोबस्‍त आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर- अहमदनगर जिल्‍ह्यात विसर्जन मिरवणूकांना सुरूवात झाली आहे. शहरातील सोमेश्वर मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या थाटात सुरूवात झाली आहे. लोकमान्‍य टिळकांनी या मंडळाला भेट दिली होती. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली, त्‍यानंतर मिरवणूकीला सुरूवात झाली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राज्‍यातील विविध शहरांमधील देखावे..
पुढे पाहा, औरंगाबादेतील मिरवणूक व ढोल पथकाचा जल्‍लोष..
बातम्या आणखी आहेत...