आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हे वार्ता: विकृत मवाल्याची समर्थनगरात दहशत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समर्थनगर भागात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावर थुंकणाऱ्या तरुणाची दहशत पसरली आहे. मागील दोन आठवड्यांपासून हा प्रकार घडत असून नागरिकांनी या विकृत तरुणाच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. येथील राम मंदिर, वरद गणेश मंदिराच्या परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी महिला जातात. यादरम्यान २० ते २२ वर्षीय एक तरुण दुचाकीवर येतो आणि या महिलांच्या पाठीवर थाप मारतो, तर काही महिलांच्या अंगावर थुंकतो आणि वेगाने पळून जातो, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी अशाप्रकारच्या घटना सिडको भागात घडत होत्या. एक तरुण रात्री शतपावलीसाठी निघणाऱ्या महिलांची छेड काढत हाेता.
पुढे वाचा... आठ हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार जाळ्यात
बातम्या आणखी आहेत...