आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदीत चित्रपट अभिनेत्रीवर पैठणमध्ये सामूहिक बलात्कार, आरोपी फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - चित्रपटात काम केल्याचे मानधन घेण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. पीडित तरुणीने या नराधमांच्या तावडीतून आपली सुटका करत क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले आणि पाचही जणांविरुद्ध तक्रार दिली. ही माहिती शहर पोलिसांनी पैठण पोलिसांना दिली. पोलिसांनी गोविंद चितलांगे (रा. अंबड) याला अटक केली. आकाश चितलांगे आणि इतर तीन आरोपी फरार झाले आहेत.

अंबड येथील आनंद मघाडे यांनी ‘लहानपण’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटासाठी त्याला अभिनेत्रीची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांचा शेजारी गोविंद चितलांगेने त्यांना अभिनेत्री देण्याचे सांगितले होते. चितलांगेची शेवगाव येथील एका युवतीशी ओळख असल्याने त्याने तिला चित्रपटात काम मिळवून दिले. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची शूटिंग अंबडला सुरू होती. दरम्यान, चित्रपटात काम केल्याचा मोबदला म्हणून युवतीने मुंबईला जायचे असल्याचे सांगत चितलांगेकडे दहा हजारांची मागणी केली होती. पैठण येथील एका हॉटेलात कामाला असलेल्या चितलांगेनेतिला पैठणला बोलावले. त्यानुसार ही तरुणी रविवारी दुपारी उस्मानपु-यांच्या डान्स अ‍कॅडमीतील मोहसिन नावाच्या युवकासह पैठणला गेली. तिची चितलांगेशी भेट झाल्यानंतर मोहसिन तेथून निघून आला. चितलांगे आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिला कारमध्ये बसवून जायकवाडी धरणाच्या बाजूला असलेल्या एका व्यापाऱ्याच्या शेतातील खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला एक हजार रुपये देऊन औरंगाबाद येथे आणून सोडले. तरुणीने मोहसिनशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, तिने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला.
आयुक्तांच्या आदेशाने क्रांती चौक पोलिस ठाण्यात झीरोने गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे प्रकरण पैठण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून गोविंद चितलांगे याला अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांनी दिली. पुढील तपास पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सी. पी. काकडे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...