आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांजणगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार, सासरच्या मंडळींनी अत्याचार केल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रांजणगाव शेणपुंजी येथे आईसह राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेवर सासरच्या मंडळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात पुरुषांसह दोन महिलांचा समावेश असून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी दिली.

वाळूज एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या फिर्यादित नमूद केल्याप्रमाणे, पीडित महिला अनेक दिवसांपासून रांजणगाव शेणपुंजी येथील सद‌्गुरूनगरात आईसह राहते. दोन मुलांना तिने शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवले आहे. घटनेच्या दिवशी सोमवारी २१ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास महिलेची वृद्ध आई घराचा दरवाजा उघडून बाहेर गेली असता त्याचवेळी दीर जोतिराम बाबा गावडे(रा. बागलवाडी, जि. उस्मानाबाद), तसेच त्याचे मित्र शंकर मच्छिंद्रनाथ झनझने (रा. पाथरोड, उस्मानाबाद), बन्सी नामदेव काटे, शिवाजी काटे, राजू प्रेमराज कडेल, संजू प्रेमराज कडेल, गोपाल रूपचंद्र कडेल (तिघेही रा. सोनई, ता. नेवासा) तसेच जाऊ सुवर्णा जोतिराम गावडे, नणंद रोहिणी दत्तात्रय उबाळे घरात घुसले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

पुढे वाचा.. सिगारेटचे चटके दिले