आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangapur Co opretive Sakhar Karkahana Election 60% Voting

गंगापूर साखर कारखाना निवडणुक : ४३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकांच्या निवडीसाठी आज तालुक्यातील ३५ मतदान केंद्रांवर सरासरी ६० टक्के मतदान झाले. आगामी काळात तालुक्यावर कोणाचे वर्चस्व राहणार हे ठरवणाऱ्या या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब, कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासह ४३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

या निवडणुकीत एकूण १४,०५० मतदारांपैकी ८,४२३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सोसायटी मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले. त्यात ७२ मतदारांपैकी ७२ मतदारांनी मतदान केले. मतदानकेंद्रनिहाय मतदानामध्ये जामगाव क्र. १ मध्ये ६७ टक्के, क्र. २ मध्ये ५७ टक्के मतदान झाले, ममदापूर ६७ टक्के, नेवरगाव केंद्र क्र. १ मध्ये ६१ टक्के, केंद्र २ मध्ये ६७ टक्के, वरखेड ७४ , मुद्देशवाडगाव ६१, रांजणगाव नरहरी ६१, मांजरी ६३, काटेपिंपळगाव ५९, मालुंजा खु. ५८, नगर परिषद गंगापूर ५२ टक्के मतदान झाले. बाबरगाव ५७, मालुंजा बु. ५३, कायगाव ६२, गणेशवाडी ६१, भिवधानोरा ६२, ढोरेगाव ५६, जिकठाण ४७, शेंदुरवादा ५५, सावखेडा ६५, मांगेगाव ५५, गाजगाव ४७, भोयगाव ५६, अंबेलोहळ ५९, वाळूज केंद्र क्र. १ मध्ये ५५, केंद्र २ मध्ये ५८, आसेगाव ५८, सिद्धनाथ वाडगाव ५६, सिरेगाव ५८, सावंगी ६२, डोणगाव ६४, माळीवाडगाव ६७ टक्के मतदान झाले.