आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापुरातील पेट्रोल पंपाला आग; दीड तासानंतर मिळवले नियंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- गंगापूर शहरात औरंगाबाद रोडवर असलेल्या इंडियन आॅइलच्या नाहदी पेट्रोल पंपाला आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पेट्रोल-डिझेलने भरलेले १२ हजार लिटरचे टँकर, पंपाचे केबिन भस्मसात होऊन ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमनचे तीन बंब स्थानिक चार पाण्याच्या ट्रॅक्टर्सच्या मदतीने दीड तासांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाहदी पेट्रोल पंपावर बारा हजार लिटर पेट्रोल डिझेलने भरलेल्या टँकरमधील इंधन खाली करीत असताना अचानक आग लागली. आग लागल्याबरोबर टँकरमधील पेट्रोल डिझेलने पेट घेतल्यामुळे आगीच्या प्रचंड लोळामुळे शहरातील हजारो नागरिकांनी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. आगीचे स्वरूप भीषण असल्याने पोलिसांनी नागरिकांनी तातडीने परिसरातील लोकांना घराबाहेर काढले. अग्निशमनची यंत्रणा नसल्यामुळे एक ते दीड तासानंतर औरंगाबाद येथून एमआयडीसी महानगरपालिकेचे अग्निशमन दल वैजापूर नगर परिषदेचे बंब स्थानिक पिण्याच्या पाण्याचे चार टँकर आग विझविण्यासाठी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.

१०० जणांना पोहोचवले सुरक्षितस्थळी
आगीनेरौद्ररूप धारण करताच पोलिसांनी तातडीने पेट्रोल पंपाच्या परिसरातील घरांतून जवळपास शंभर जणांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवले. घटनेदरम्यान पेट्रोल पंपावर सहा कर्मचारी कार्यरत होते. परंतु यात सुदैवाने जीवितहानी टळली. एका टँकरमधून पेट्रोल आणि एका टँकरमधून डिझेल उतरवण्याचे काम सुरू होते. परंतु या घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे.

मोठी दुर्घटना टळली
आगलागल्यानंतर पेट्रोल खाली करत असताना पेट्रोलच्या टँकरवर असलेले सर्व झाकणे उघडी असल्यामुळे स्फोट झाला नाही. शिवाय पेट्रोल पंपाच्या खाली असलेल्या टाक्यांना आगीची झळ बसली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्फोटाच्या भीतीने शहर परिसरातील सर्व नागरिक रस्त्यावर आले होते.

बारा हजार लिटरचे टँकर आगीत जळून खाक
याआगीमुळे पेट्रोल-डिझेलने भरलेले बारा हजार लिटरचे टँकर जळून खाक झाले. शिवाय पेट्रोल पंपाचे केबिन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे अंदाजे चाळीस लाखांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी औरंगाबाद येथील मनपा, एमआयडीसी वैजापूर नगरपालिकेच्या बंबासह उपविभागीय पोलिस अधिकारी शरदचंद्र बर्डे, सपोनि गणेश जामदार यांच्यासह पोलिस यंत्रणा स्थानिक स्वयंसेवी संघटनांचे पाण्याचे टँकर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.