आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलच्या चुकीमुळे सदस्य झाला उपसरपंच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - गंगापूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या नजरचुकीमुळे एकलहेरा-नांदेडा ग्रुप ग्रामपंचायतीतील सदस्याला कागदोपत्री का होईना, उपसरपंच पद मिळाले. विशेष म्हणजे या उपसरपंचाने लगेचच पदभार घेऊन ग्रामपंचायतीची एक मासिक बैठकही बोलावली. त्यामुळे गोंधळलेले विद्यमान उपसरपंच दिनकर काळे यांनी या प्रकरणी कायदेशीर कार्यवाहीची मागणी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

एकलहेरा-नांदेडा ग्रामपंचायतस रपंच व उपसरपंचपदाची निवडणूक 3 डिसेंबर 2010 मध्येच झाली आहे. सरपंचपदावर बिजलाबाई दादासाहेब गांगर्डे तर उपसरपंचपदावर दामोदर मुरलीधर काळे हे दोघे बिनविरोध निवडून आले. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या रजिस्टरवर गंगापूर तालुक्यातील सरपंच-उपसरपंचांच्या नोंदीमध्ये 31 मे 2013 पूर्वी नजरचुकीने ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब दामोदर जाधव यांचे नाव उपसरपंच म्हणून नोंदवले गेले. त्यामुळे जाधव यांनी त्या नोंदीची सत्यप्रत घेऊन उपसरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला. यासंदर्भात, विद्यमान सरपंच बिजलाबाई गांगर्डे यांनी ध्वजवंदन के ल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांसमोर तशी घोषणाही केली. या घोषणेनंतर ग्रामपंचायतीची 23 ऑगस्टला मासिक बैठक झाली. या बैठकीला सरपंच गांगर्डे या हजर नव्हत्या.

विद्यमान सरपंच गांगर्डे यांनी पदाचा गैरवापर क रून बेकायदेशीरपणे उपसरपंचपदावर जाधव यांना बसवून उपसरपंचपदाचा गैरवापर करवून घेतला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 39 प्रमाणे पद रद्द करण्याची मागणी दिनकर काळे यांनी केली आहे.

उपसरपंच दिनकर काळेच
तहसील कार्यालयाची चूक तहसीलदार रूपाली चित्रक यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली. त्यांनी चौकशी केल्यानंतर झालेली चूक दुरुस्त केली.