आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाच्या बहाण्याने बाहेर नेत 22 वर्षीय विवाहितेवर गँगरेप, औरंगाबादेत धक्‍कादायक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्याने बाहेर नेत 22 वर्षीय विवाहितेवर चौघांनी बलात्कार केल्‍याची धक्‍कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. गुरुवारी रात्री शेंद्रा एमआयडीसीतील भालगाव शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी एका आरोपीला शनिवारी अटक करण्‍यात आली आहे.

पार्टीला चल, म्‍हणत नेले बाहेर  
गुरुवारी रात्री 7.30 वाजता मुकुंदवाडीमध्ये राहणा-या विवाहितेला तिच्‍या ओळखीच्‍या तरुणाने बाहेर नेले होते. 'माझा वाढदिवस आहे. पार्टीला चल', असे म्‍हणत दुचाकीवर बसवून त्‍याने तिला बाहेर नेले. पहिले विवाहितेला झाल्टा फाटा येथे चहा पा‍जला व पुढे जेवण करायला जाऊ, असे म्‍हणत तिला भालगाव शिवारात नेले. तेवढ्यात त्यांच्या पाठी मागून तरुणाचे आणखी 3 मित्र दुचाकीवर आले. मित्र असल्याचे मुख्य आरोपीने सांगितल्याने तरुणीही काही म्हटली नाही. तरुणांनी सोबत दारू, कोल्ड्रिंक व जेवणाचे साहित्यही सोबत आणले होते. तरुणीने दारू पिण्यास नकार दिला तेव्हा त्यातील एकाने तिला कोल्ड्रिंक पिण्यास दिले. परंतू कोल्ड्रिंक मध्ये दारू मिसळून दिल्याचे तरुणीच्या लक्षात आले नाही. थोड्या वेळाने तरुणीला गुंगी येऊ लागताच एकाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र धमकावत त्याने तिच्‍यावर अत्याचार केला.

चौघांनी केला अत्‍याचार
तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, इतर तिघांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केला. यादरम्‍यान तरुणी बेशुद्ध पडली. चौघांनी तिला बेशुद्धावस्थेतच चिकलठाणा विमानतळा समोरील पेट्रोलपंपा समोर टाकून पोबारा केला. सकाळी पंप चालकाला रस्त्यावर तरुणी बेशुद्धावस्थेत दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी जात तरुणीला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिकउपचारा नंतर पोलिसांनी शनिवारी पहाटे तीन वाजता तिचा जबाब नोंदवून चिकलठाणा पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला.
 
एकाला अटक, तिघांचा शोध सुरु
पीडित तरुणी बावीस वर्षाची असून ती आई, भाऊ व पती सोबत मुकुंदवाडी परीसरात राहते. तिला सात वर्षांचा मुलगा असून पती चालक आहे. मुख्य आरोपीला सध्या ताब्यात घेतले असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.
 
पोलिसांची घटनास्थळाची पाहणी
ताईतवाले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथून पोलीसांनी दारूच्या बाटल्या व कंडोम चे पाकीट म्हणून जप्त केले.
 
बातम्या आणखी आहेत...