आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangsters Attack On Food Plaza At Railway Station

रेल्वेस्टेशनमधील फूड प्लाझावर गुंडांचा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वेस्थानकातील फूड प्लाझावर सोमवारी रात्री चार गुंडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. हॉटेल मालकाला मारहाण करत वस्तूंची नासधूस केली. काही प्रवाशांना शिवीगाळही केली. हा प्रकार सुरू असताना रेल्वे पोलिस आणि शहर पोलिस मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत होते. व्यवस्थापक राजीव दुबे यांनी मंगळवारी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली आहे.

सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास १५ ते २० जणांच्या टोळक्याने फूड प्लाझात प्रवेश केला आणि कॅश काउंटवर बसलेल्या वीरसिंग कुमार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी मध्यस्थी करणारे शैलेश तिरले यांनादेखील मारहाण करण्यात आली. हा सगळा प्रकार फूड प्लाझाचे मुख्य व्यवस्थापक राजीव दुबे यांना कामगार मुलांनी सांगितला. त्यांनी तत्काळ स्टेशनवरील रेल्वे पोलिस आणि जीआरपीच्या जवानांना कळवले. मात्र, केवळ दोनच पोलिस असल्याने गुंडांना रोखण्याची त्यांची हिंमत झाली नाही. अखेर दुबे यांनी नियंत्रण कक्षाला कळवले; पण पोलिस दोन तास उशिरा आले. त्यांनी गुंडांना हकलून दिले, मात्र कोणालाही ताब्यात घेतले नाही. दुबे यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलिस निरीक्षक डंबाळे तपास करत आहेत.
गुंडसांगत होते, मी पोलिस उपायुक्तांचा पुतण्या : गेल्यादोन दिवसांपासून हे तरुण या हॉटेलवर येऊन धिंगाणा घालत असल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. १४ डिसेंबरच्या रात्री तीन तरुण जेवण्यासाठी आले. त्यांचे साडेतीनशे रुपये बिल झाले होते. तुम्ही जास्तीचे बिल लावले, असे म्हणून त्यांनी हॉटेल मालकाशी वाद घातला. मी पोलिस उपायुक्तांचा पुतण्या आहे, तर दुसरा मी नगरसेवक आहे, असे म्हणत धमक्या देत होते. हॉटेल मालकांनी त्यांना डिस्काउंट देत त्यांच्याकडून दोनशेच रुपये घेतले. तेव्हा ते हॉटेलमधून निघून गेले आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा आले. त्यांनी मोबाइल पाकीट चोरीला गेले, असे म्हणत धिंगाणा सुरू केला. तेव्हाही हॉटेल व्यवस्थापकाने त्यांची समजूत काढली आणि त्यांची तक्रार घेऊन परत पाठवले. सोमवारी मध्यरात्री १५ ते २० जणांनी धिंगाणा केला. टाटा मांझा कारमधून आलेल्या एकाचे नाव मनदीप हरी किशन, प्रेमकिशोर पेशवानी आणि राहुल असे आहे. हा सारा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी. के. मीना यांनी हॉटेल व्यवस्थापकाची चौकशी केली.