आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garbage Remove In Three Days Says Bhapkar In Meeting Aurangabad

3 दिवसांत शहर कचरामुक्त करा - पुरुषोत्तम भापकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रॅम्कीने घनकचरा व्यवस्थापनाचे काम थांबवल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रविवारी पाहणी केली असता त्यांना हे चित्र दिसले. हवे ते साहित्य खरेदी करा, भाड्याने घ्या, पण तीन दिवसांत शहर कचरामुक्त करा, अन्यथा सहावा वेतन आयोग रोखण्यात येईल, असा इशारा त्यांनी सोमवारी बैठकीत दिला.
डॉ. भापकर यांनी काल शहरातील वेगवेगळ्या भागांची पाहणी केली. रॅम्कीच्या 35 रिक्षा बंद झाल्याने लहान गल्ल्यांमधील कचरा उचलण्यात येत नाही. नागरिक तो रस्त्यावर टाकतात, असे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने 35 रिक्षा मजुरांसह भाड्याने घेण्याचे आदेश अधिका-यांना दिले.
येत्या तीन दिवसांत शहर कचरामुक्त करण्यासाठी अधिका-यांनी प्रयत्न करावेत, त्यांना आवश्यक ते साहित्य खरेदी करावे, परंतु शहरात कचरा दिसता कामा नये. पुन्हा शहरात कचरा दिसल्यास सहाव्या वेतन आयोगाची रक्कम दिली जाणार नाही, पाचव्या वेतन आयोगानुसार पगार स्वीकारण्याची तयारी ठेवा, अशी तंबीही दिली. नियमानुसार आस्थापनावरील खर्च 35 टक्क्यांच्या पुढे जाता कामा नये. परंतु महापालिकेत हा खर्च 45 टक्के आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही पालिकेची जबाबदारी - रॅम्की गेली म्हणून शहरात कचरा साचून राहतो हे योग्य नाही. ती पालिकेची जबाबदारी आहे. मी अधिका-यांना सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. तीन दिवसांत योग्य तो परिणाम दिसला नाही तर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. दोषींना पाचव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाईल. - डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त