आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garware Polyester Ltd., Chikalthana, Aurangabad News In Marathi

Exclusive:‘गरवारे’चा चिकलठाण्यातील कारखाना बंद, कर्मचार्‍यांना दुसर्‍या कंपनीत सामावून घेतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -चारचाकी वाहनांना लावल्या जाणार्‍या सनकंट्रोल फिल्मच्या निर्मितीचे जनक म्हणून जगात नाव कमावलेल्या गरवारे कंपनीचे देशांतर्गत सनकंट्रोल फिल्मचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. औरंगाबादच्या औद्योगिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या या चाळीस वर्षे जुन्या कारखान्याची यंत्रे आता थांबली आहेत. सनकंट्रोलवरील देशांतर्गत बंदीचा फटका कारखान्याला बसला असला तरी कंपनीने वाळूजच्या प्रकल्पात आणखी शंभर कोटींची नवीन गुंतवणूक करून सर्व कामगारांना समाविष्ट करून घेतले आहे.
शशिकांत गरवारे यांनी 1974 मध्ये चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत गरवारे पॉलिस्टर हा कारखाना सुरू केला तेव्हा साध्या फिल्मचे उत्पादन येथे सुरू होते. अविनाश बापट, मोहन आडसूळ व अनिल भालेराव या मराठी तंत्रज्ञांनी औरंगाबाद शहरातच संशोधन करून भारतीय बनावटीची जगातील पहिली सनकंट्रोल फिल्म या कारखान्यात तयार केली. त्यामुळे गरवारे कंपनीला सनकट्रोल फिल्मचे जनक म्हणून जगभरात ओळख मिळाली.

पुढील स्लाइडमध्ये, कोर्टाच्या आदेशामुळे फिल्मवर आली बंदी