आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garware Stadium Make For Ranji, Municipal Corporation Take Vengasarkar Help

गरवारे स्टेडियम मनपा 'रणजी'योग्य बनवणार वेंगसरकर यांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या गरवारे स्टेडियम रणजी सामने खेळण्यायोग्य करण्यासाठी मनपा महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचे मार्गदर्शन घेत आहे. या कामाला लागणारा निधी खासगी कंपन्या संस्थांमार्फत उभारण्याची मनपाची योजना असून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

गरवारे स्टेडियमचे मैदान इमारतीचीही दुरवस्था झाली अाहे. आता हे मैदान जाहीर सभा बड्यांच्या घरची लग्ने प्रदर्शनांसाठीच उरल्यासारखे झाले आहे. या मैदानाच्या दुरुस्तीसाठी मनपाच्या तिजोरीत पैसाही नाही. पण क्रिकेटपटू असलेले आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी तीन वेळा या मैदानाची पाहाणी करून बारीकसारीक माहिती घेतली आहे. आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गरवारे स्टेडियमवर रणजीचे सामने खेळवता येऊ शकतील. मात्र त्यासाठी मैदान इमारतीत बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत. आज घडीला गरवारे काही उद्योगांनी या कामासाठी दीड कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली असली तरी ते पुरेसे नाहीत. मैदान कसे असावे, पॅव्हेलियन कसे असावे तसेच तेथे काय सोयीसुविधा असाव्यात याबाबत महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचे मार्गदर्शन मनपा घेणार आहे.