आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केंद्राची स्कीम घ्या, नाहीतर गॅस सिलिंडर मिळणार नाही’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गॅस कंपनीच्या नावाखाली शहरातील ग्राहकांची लूट केली जात आहे. सुरक्षेसाठी तुमच्या गॅसची तपासणी आवश्यक अाहे. ही केंद्राचीच स्कीम असून तपासणी सक्तीची आहे. ती केली नाहीतर पुढे सिलिंडर मिळणार नाही, अशी भीती घालून प्रत्येक ग्राहकाकडून या तपासणीच्या नावाखाली सर्रास ७५ रुपये उकळण्याचा प्रकार काही लोक करत आहेत. त्यात वितरक एजन्सीजचेही लोक आहेत. ही तपासणी ऐच्छिक आहे, असे स्पष्टीकरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी डीबी स्टारकडे केले आहे.
गॅस कंपन्यांतर्फे दर दोन वर्षांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गॅस कनेक्शनची तपासणी करण्यात येते. तसेच त्यासाठी शासनमान्य फी ७५ रुपये आकारण्यात येते. अर्थात, सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक फायद्याचीही आहे. पण त्याची सक्ती मात्र नाही. पण सध्या शहरात गॅस वितरक एजन्सीजचे दलाल सर्वत्र फिरून लोकांना गॅस कनेक्शनच्या तपासणीची सक्ती करत आहेत.

ऑनलाइन बुकिंगची फी...
भारतगॅसच्या मंगेश गॅस सर्व्हिसेसच्या वतीने सिडकोतील अनेक भागांमध्ये असा ताप ग्राहकांना दिला जात आहे. ही केंद्र शासनाची योजना असून तुम्हाला ७५ रुपये द्यावे लागतील, ही फी ऑनलाइन गॅसची बुकिंग करण्यासाठी घेत असल्याचेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. जी माणसे तुमच्या घरी येत आहेत ती शासनाची असल्याचेही तो म्हणाला.

लोगो-सिम्बॉलनाही...
केंद्र सरकारची योजना असल्याचा बहाणा करून पैसे घेणाऱ्या या लोकांकडे केंद्र शासनाचा लोगो अथवा सिम्बॉल असलेली कुठलीही कागदपत्रे नाहीत. काही ठेकाणी केवळ ‘भारत गॅस’ असे लिहिलेल्या कागदावर ग्राहकांकडून विविध २६ प्रश्नांची उत्तरे होय अथवा नाही या स्वरूपात भरून घेतली जात आहेत. दोन वर्षांची संपूर्ण सुरक्षा किंमत फक्त ११ पैसे म्हणजेच ७५ रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

ग्राहक प्रबोधनाचे पैसे
दर दोन वर्षांनी भारत गॅसतर्फे ग्राहकांना हवे असल्यास गॅस कनेक्शनविषयक ग्राहक जनप्रबोधन करण्यात येते. त्याची फी नियमानुसार ७५ रुपये असल्याचीही माहिती मिळाली. आहे. याचीही सक्ती नाहीच.
गॅसची तपासणी करताना शहरातील गॅस एजन्सीजमार्फत ग्राहकांकडून असा फॉर्म भरून घेतला जात आहे. यात तब्बल २६ प्रश्न आहेत.

ज्याला पाहिजे त्यानेच तपासणी करावी...
ज्याग्राहकालाआपल्या घरातील गॅस सिलिंडरची तपासणी करून घ्यावी असे वाटते त्यांच्यासाठीच ही तपासणी असते. याबाबत कुणालाही सक्ती करता येत नाही. ही तपासणी ऐच्छिक आहे. याचा केंद्र शासनाचा काहीही संबंध नाही. -प्रकाश आस्वार, मंगेशगॅस सर्व्हिस, भारत गॅस वितरक

सक्तीनाही, पण ही तपासणी फायद्याची
इंडेनकडूनहीअशाप्रकारचे सर्वेक्षण करण्यात येते. पण ज्या ग्राहकाला तपासणी करायची आहे त्यांच्याचकडे ती केली जाते. प्रत्येक ग्राहकाला ही तपासणी करणे बंधनकारक नसते. पण ती करणे केव्हाही गॅस ग्राहकाच्या फायद्याचे असते. -विष्णू काकडे, इंडेनगॅस कंपनी

सेफ्टीसाठीच
सुरक्षेसाठी दरवर्षांनी तपासणी केली जाते. पण आजकाल फक्त ७५ रुपये घेतले जातात, गॅसची तपासणी मात्र नीटनेटकी केली जात नाही. ती करणे अत्यावश्यक आहे. तसेच बहुदा आता तपासणी फीस ७५ वरून १५० करण्यात आली असल्याचे समजले आहे. पण ग्राहकाला तपासणी करणे बंधनकारक नसते. -जितेंद्र कक्कर, एचपीगॅस कंपनी
बातम्या आणखी आहेत...