आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुकिंग करूनही ग्राहकांना गॅस वेळेवर मिळेना;हेल्पलाइनवरही वाढल्या तक्रारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बुकिंग करूनही गॅस सिलिंडरसाठी पाच दिवस वाट पाहावी लागत असल्याने 21 दिवसांत गॅस मिळण्याचे आश्वासन केवळ बतावणी ठरत आहे. ऐन थंडीमध्ये गॅस सिलिंडरची ही टंचाई उद्भवल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टोल फ्री हेल्पलाइनवरही याविषयी अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईचा सर्वाधिक परिणाम महिलांच्या दैनंदिन कामावर होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे, महिलांची घरातील सर्वाधिक कामे ही गॅसवर अवलंबून असतात. त्यात थंडीमध्ये गॅसची मागणी वाढलेली असते. पण बुकिंग करूनही ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी वाट पाहावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अन्नधान्य वितरण अधिका-यांकडे याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत. पण तरीही परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही. 21 दिवसांच्या आत गॅस सिलिंडरचा पुरवठा करणे आवश्यक आहे. पण त्यानंतर पाच दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे.
प्रशासन करणार चौकशी - याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिरंगाईबद्दल चौकशी करणार असल्याची माहिती दिली. गॅस वितरणाला वेळ लागण्यामागील कारणांचा शोध घेऊन गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरातून 25 तक्रारी- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टोल-फ्री हेल्पलाईनवर गॅस वितरणाविषयी, दिरंगाईबद्दल आतापर्यंत 25 तक्रारी दाखल झाल्या असून क ाही नागरिक स्वत: तक्रार दाखल करण्यासाठी येत आहेत. या तक्रारी अन्नधान्य वितरण अधिका-यांकडे वर्ग करण्यात येऊन त्यांचा निपटारा करण्यात येणार आहे.
हेल्पलाईनवर नोंदवा तक्रार - गॅस एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर उपलब्ध होत नसेल तर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 2222222 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आवाहन अन्नधान्य वितरण अधिका-यांनी केले आहे.
वेळेवर डिलिव्हरी नाही- बुकिंग करूनही गॅस वेळेवर मिळत नाही. एक-दोन दिवसाची गोष्ट समजू शकते.मात्र पाच दिवस सिलिंडर मिळत नाहीत. गॅसची वेळेवर डिलिव्हरी मिळायला हवी - सुवर्णा गायकवाड, गृहिणी, टीव्ही सेंटर
थंडीत गॅस गरजेचा - थंडीमध्ये पाणी गरम करावे लागते. त्यामुळे गॅस लवकर संपतो. अशावेळी सिलिंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यास त्रास होतो. त्यातही तीन-चार दिवस गॅस मिळत नाही म्हटल्यावर सामान्य ग्राहकांनी काय करावे.- पल्लवी देसाई, गृहिणी, हडको
बुकिंगनुसार वितरण सुरू - थंडीचे दिवस असल्याने गॅस सिलिंडरची मागणी वाढली आहे. ग्राहकांना बुिकंगनुसार सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्टॉकनुसार वितरण करण्यात येत आहेत. वेळेवर गॅस मिळत नसल्यास त्यांनी एजन्सीला कळवावे. - मंगेश असवार, गॅस एजन्सी मालक