आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद: नव्याने खरेदी केलेले गॅस सिलिंडर आणि शेगडी घरात बसवताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने पती-पत्नी भाजले. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेदरम्यान चिश्तिया कॉलनीत घडली. या स्फोटात घरगुती साहित्य जळून खाक झाले.
शेख हिमायत मुतरुझा अली पत्नीसह चिश्तिया कॉलनीत राहायला आले आहेत. सय्यद वाजेद सय्यद अहमद अली यांच्या घराच्या दुसर्या मजल्यावरील खोलीत ते भाड्याने राहतात. बुधवारी सायंकाळी ओंकार गॅस एजन्सीमधून नवीन एचपी कंपनीचे सिलिंडर खरेदी केले. कनेक्शन जोडण्यासाठी गॅस एजन्सीचा कर्मचारी सुभाष ठेंब त्यांच्या घरी आला. सुभाष सिलिंडरला नळी बसवत असताना खोलीत स्टोव्ह सुरू होता. एवढय़ात गॅस गळती झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला आणि शेख हिमायत आणि त्याची पत्नी किरकोळ भाजले. यात सुभाष ठोंब बालंबाल बचावला. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांच्या कानठळ्या बसल्या. आग पसरल्याचे दिसताच नागरिकांनी शेख हिमायतच्या घराच्या दिशेने धाव घेतली. चिंचोळ्या जिन्यातून शेख हिमायत, त्यांची पत्नी आणि सुभाष धावतच खाली आल्याने अनर्थ टळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.