आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोलला पर्याय गॅसकिट, दुचाकींनाही गॅसकिट बसवणे शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पेट्रोलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलवर चालणारी वाहने वापरणे अवघड झाले आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून गॅसचाही वापर करता येतो. शहरात सन 2005 पासून वाहनांमध्ये गॅसकिटचा वापर सुरू झाला आहे, परंतु गॅसकिटबाबत असलेल्या भीतीमुळे वाहनचालक त्याच्या वापराकडे वळत नाहीत. शहरात 36 पेट्रोल पंपाच्या तुलनेत फक्त 3 गॅस पंप आहेत. तेही शहरांच्या बाहेर असल्यामुळे गॅस सहज उपलब्ध होत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे आजपर्यंत शहरात फक्त 2000 च्या जवळपासच चारचाकी वाहनांना गॅसकिट बसवण्यात आले. चारचाकी वाहनाला गॅसकिट बसवल्यास 35 टक्क्यांपर्यंत पैशाची बचत होते. बाजारात 13 हजार ते 21 हजारापर्यंत विविध कारसाठी गॅसकिट उपलब्ध आहे ़

देखभाल खर्चातही फारसा फरक नाही
इंधनासाठी गॅसचा वापर केल्याने वाहनाच्या देखभाल खर्चातही फारसा फरक पडत नाही. काही लोक घरगुती एलपीजी गॅसचा अवैधरीत्या वापर करतात, पण घरगुती गॅसमध्ये वॅक्स (कचरा) चे प्रमाण जास्त असल्याने तो इंजिनमध्ये साचतो आणि वाहनात बिघाड निर्माण होते. म्हणून गॅस पंपावर असलेल्या शुद्ध गॅसमुळे मायलेजही चांगले मिळते आणि इंजिनही अधिक काळ चांगले राहते.

गॅस-पेट्रोल फरक असा

रिक्षांनाही 8 हजार 500 रुपयांत गॅसकिट बसवता येते. गॅसकिट बसवल्यावर रिक्षा एक लिटर गॅसमध्ये 32 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. 150 सीसी मोटार सायकलस्वारही आता गॅसकिट बसवून एक लिटर गॅसमध्ये 40 ते 50 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळवू शकते.

पर्यावरण संवर्धनासाठीही फायदेशीर

पेट्रोल आणि डिझेल पूर्णपणे जळत नसल्याने धुरामधून कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आदी हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन ते वातावरणात मिसळतात. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणही वाढते. याउलट एलपीजी गॅस पूर्णपणे जळत असल्याने वाहनातून हानिकारक वायूंचे उत्सर्जन कमी होते. म्हणून पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठीही एलपीजी गॅसचा वापर चांगला आहे ़

सध्या काही विशिष्ट दुचाकींनाच गॅसकिट वसवता येते. त्यात होंडा अँक्टिव्हा, स्टार सिटी, डिस्कव्हर, पल्सर, पॅशन, स्प्लेंडर, स्कूटीचा समावेश आहे. या दुचाकींसाठी 6 हजार रुपयांत गॅसकिट बाजारात उपलब्ध आहे.

कोणताही धोका नाही
वाहनांना गॅसकिट बसवल्यावर कोणत्याही प्रकारचा धोका नाही. शासनाकडून प्रमाणित संस्थेकडूनच गॅसकिट बसवावे, असे मोटार वाहन निरीक्षक एम. डी. अनासने यांनी सांगितले. ते म्हणाले की, गॅसकिटमध्ये सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली गेली आहे. वायरिंग आदींबाबत योग्य काळजी घेतल्यावर वाहनासाठी गॅसकिट वापरण्यात कोणताही धोका नाही. काही पैशाची बचत करण्यासाठी कोणत्याही अनधिकृत ठिकाणी गॅसकिट न बसवता अधिकृत रेटरोफिटरकडेच बसवावे. तसेच घरगुती गॅसचा वापर धोकादायकरीत्या न करता गॅस पंपावरच वाहनात गॅस भरावा.