आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान एक वर्षानंतर पुन्हा करता येईल सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-पंतप्रधा ननरेंद्र मोदी यांनी श्रीमंत व्यक्तींनी घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान नाकारण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्हाधिकारी, आमदार, महापौर आणि शहरातील ५०० सामान्य नागरिकांनीही अनुदान नाकारले आहे. ज्यांनी अनुदान नाकारले त्यांना पुन्हा अनुदान हवे असल्यास एका वर्षानंतर अनुदान स्वीकारण्याची सुविधा कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
जून महिन्यापासून अनुदान नाकारण्याची प्रक्रिया देशभरात राबवण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. दुसऱ्या महिन्याच्या प्रारंभी शहरातील अनुदान नाकारणाऱ्यांची संख्या ६५० वर पोहोचली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी अनुदान नाकारण्यासाठी कंपनीचे अधिकारी आणि एजन्सीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योगपती आणि लोकप्रतिनिधींनी हे अनुदान सुरुवातीला नाकारल्यास इतर नागरिकांकडूनही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा कंपन्यांना आहे. कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधी उद्योगपतींच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

का नाकारावे अनुदान
ग्राहकांकडूननाकारण्यात येणाऱ्या अनुदानातून बीपीएलच्या लाभार्थींना गरिबांना यातून मोफत गॅस सिलिंडरची व्यवस्था करण्यासाठी सगळ्याच ग्राहकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची पद्धत
ज्याग्राहकांनी अनुदान नाकारण्यासाठी एक छोटासा अर्ज भरून दिला, अशाच प्रकारचा एक अर्ज अनुदान स्वीकारण्यासाठी भरून दिल्यास तत्काळ अनुदानाचा लाभ होऊ शकतो. मात्र, अनुदान नाकारण्यासाठी भरलेल्या अर्जानंतर एक वर्षाच्या अवधीनंतरच अनुदान स्वीकारण्याचा अर्ज करता येऊ शकतो.

पुन्हा अनुदान मिळू शकते
ज्यागॅस ग्राहकांनी अनुदान नाकारले आहे, त्यांना पुन्हा अनुदान घ्यावयाचे असल्यास एक वर्षानंतर अर्ज केल्यास पुन्हा अनुदान मिळू शकते. मंगेशआस्वार, संचालक, मंगेश गॅस एजन्सी