आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Tanker Crash In Chikhalthana MIDC Aurangabad

चिकलठाणा एमआयडीसी रस्त्यावर गॅस भरलेला टँकर उलटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मिसारवाडी रस्त्यावर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत आरजे 19 जेसी 6203 या क्रमांकाचा गॅस टँकर आला होता. तो रिकामा करण्यासाठी उभा केलेला टँकर चालकाने गिअरमध्ये उभा ठेवला नाही. उतारामुळे तो आपोआप मागे आला व खड्डय़ात उलटला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास कंपनीचे कर्मचारी तेथे दाखल झाले. टँकरमधून वायुगळती होत नसल्याची खात्री करून त्यांनी पोलिसांना न कळवता तेथून काढता पाय घेतला. मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यान अडीचपर्यंत प्रतीक्षा करून वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी पोलिस नियंत्रण कक्ष व अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर दहा मिनिटांत पोलिस अधिकारी व अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी आला. टँकरबद्दल माहिती का कळवली नाही म्हणून पोलिस अधिकार्‍यांनी कंपनीकर्मचार्‍यांना झापले. नागरिकांनी या दिशेने दुसरे वाहन येऊ नये, याची रात्री उशिरापर्यंत काळजी घेतली.