आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेट परीक्षेचे पॅटर्न बदलले; अंकगणिताचा वाढीव पेपर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) तर्फे दरवर्षी अभियांत्रिकीसाठी गेट अर्थात ग्रॅज्युएट अँप्टिट्यूट टेस्ट घेण्यात येते. या परीक्षेत येत्या शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात आला आहे. परीक्षेतील बदल आणि अभ्यासक्रमातील बदलांविषयीची माहितीही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या नवीन बदलांनुसार ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. यात बहुपर्यायी, अंकगणित आणि पर्यावरण व मूल्यमापन या विषयांवर आधारित पेपर असतील.
दरवर्षी औरंगाबाद शहरातून गेट परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी चार ते पाच हजार विद्यार्थी गेट परीक्षा देतात. बीईनंतर पदव्युत्तर तसेच संशोधनासाठी मिळणार्‍या विविध संधी, फेलोशिप आणि करिअरच्याही अनेक संधी उपलब्ध होत असल्याने या परीक्षेकडे विद्यार्थी वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परीक्षेतील नवीन बदलही विद्यार्थ्यांसाठी फायद्याचेच आहेत.
ऑनलाइन अर्ज
गेट परीक्षेसाठी आतापर्यंत कागदोपत्री अर्ज प्रक्रिया होती. ती आता पेपरलेस म्हणजे ऑनलाइन झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर असून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 10 ऑक्टोबरपर्यंत जमा करायचे आहेत. विशेष बाब म्हणजे विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे परीक्षा केंद्र निवडू शकतात. निवड केल्यावरही परीक्षा केंद्र बदलायचे असेल तर 20 नोव्हेंबरपर्यंत ते बदलात येईल.
पेपरची संख्या 21 वरून 22 वर
आतापर्यंत गेट परीक्षेत 21 प्रकारचे पेपर सोडवावे लागत असत. नव्या बदलानुसार नव्या सत्रात एक पेपर वाढवण्यात आला आहे. त्यात बहुपर्यायी आणि न्यूमरिकल अर्थात अंकगणितांचा समावेश आहे. त्यात मल्टिपल चॉइस असेल, परंतु ही पद्धत अंकगणितासाठी असणार नाही. तसेच व्हच्यरुअल की बोर्डने सर्व प्रश्नांची उत्तरे लिहावी लागणार आहेत. ही परीक्षा 1 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे.
बदलाल घाबरण्याचे कारण नाही
*‘गेट’मध्ये झालेल्या बदलांना विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. उलट वाढत्या स्पध्रेत आव्हाने स्वीकारायला हवीत. शिवाय परीक्षा पद्धतीत बदल झाला असला तरी सर्व प्रश्न हे तीनही वर्षांच्या अभ्यासक्रमांवरच आधारित असतील. डॉ. उल्हास शिऊरकर, प्राचार्य देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय