आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरपिंप्रीत मुदतबाह्य औषधी साठा, जंगलात फेकली औषधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिशोर - औषधांची कालमर्यादा संपल्यास त्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहेे. मात्र, या नियमालाच मूठमाती देत गौरपिंप्री परिसरातील जंगलात उघड्यावरच औषधीसाठा टाकल्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.
गौरपिंप्री येथील जंगलात गरोदर मातेच्या संगोपनासाठी लागणारा औषधीसाठा उघड्यावरच टाकला गेला. हा औषधीसाठा कन्नड तालुक्यातील नाचनवेल आरोग्य केंद्र आणि बाबरा (ता. फुलंब्री) या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या सीमेवर आहे. नेमका हा औषधीसाठा कोणत्या केंद्राचा हे समजणे अवघड झाले आहे.
ही औषधे सापडली
विटामेक्स सिरप, डोनक्स सिरप, निकोला गोळ्या, सायरप, कॅल्सिन सिरप, फोलरॉन गोळ्या, निओफेक्स सायरप, कॅलसिलॅक गोळ्या, डायक्ल सायरप आदी दहा प्रकारच्या औषधांचा साठ्यात समावेश आहे.