आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टे विकणारे रॅकेट सक्रिय, भररस्त्यात कंबरेला बंदूक खोचून थांबतात विक्रेते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जप्त केलेले कट्टे दाखवताना पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी. - Divya Marathi
जप्त केलेले कट्टे दाखवताना पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी.
औरंगाबाद - ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच जिल्ह्यात गावठी कट्टे विकणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. एखाद्या सिनेमात दाखवतात तसे या रॅकेटमधील सदस्य भर बाजारात कंबरेला कट्टा खोचून विक्रीसाठी गुरुवारी (दि. १६) उभे होते. अशा तिघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुने कायगाव ता. गंगापूर येथील बसस्थानकाजवळील रामेश्वर मंदिरासमोरून अटक केली. वडगाव कोल्हाटी येथील राजू दहातोंडे (३५), आजिनाथ ठोंबरे (जामगाव, ता. गंगापूर) एकनाथ साळे (रा. वडगाव कोल्हाटी) अशी अटक केेलेल्या आरोपींचे नावे आहेत. या तिघांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने कायगाव येथील बसस्थानकाजवळ असलेल्या रामेश्वर मंदिराच्या कमानीजवळ दोन जण गावठी कट्टे विकण्यासाठी आले आहेत, अशी बातमी पोलिसांच्या खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांनी सापळा लावला. खबऱ्याने दिलेल्या वर्णनानुसार दोन जण त्या ठिकाणी उभे असल्याचे दिसून आले. त्यांची झाडाझडती घेतली असता एकाच्या कंबरेला दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. आजीनाथ ठोंबरे आणि राजू दहातोंडे अशी या दोन आरोपींची नावे आहेत. त्यानंतर या दोघांना गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तत्पूर्वी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी, वडगाव कोल्हाटी येथील वीटभट्टी मालक एकनाथ साळे याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सहायक पोलिस उपनिरीक्षक एम.पी आंधळे पुढील तपास करीत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, राजकीय कार्यकर्ते आणि गुन्हेगार बाळगतात कट्टे
बातम्या आणखी आहेत...