आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क येथील प्रदर्शनात सुनील देवरेंच्या शिल्पकृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- न्यूयॉर्क शहरातील गेलबर्ट स्टुडिओमध्ये १५ ते ३० मे दरम्यान आंतरराष्ट्रीय शिल्पकृतींचे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनासाठी औरंगाबादच्या सुनील काशिनाथ देवरे या कलाकाराच्या सहा शिल्पकृती निवडल्या गेल्या. या प्रदर्शनात सहभागाचा बहुमान मिळवणारे देवरे हे मराठवाड्यातील एकमेव कलावंत आहेत. मुंबईच्या जीआर्ट फाउंडेशनच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील निवडक दहा शिल्पकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात असतील. सुनीलसह मुंबईतील दोन कलाकारांची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे.

अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील सुनील गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यावसायिक शिल्पाबरोबरच त्यांनी अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. त्यातीलच शिल्प या प्रदर्शनात मांडले जातील. आपले संपूर्ण जीवन बोटीवर घालवणारा खलाशी, लावण्यवती महिलेचे सौंदर्य आणि मोराच्या रूपात साकारलेली भावना तसेच बगळ्याची सुंदरता आणि महिलेचे लावण्य हे तीन खास शिल्प या प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत. तीन फुटांच्या या मूर्ती अनुक्रमे दगड, फायबर आणि ब्रांझ धातूत साकारल्या आहेत. या अगोदरही लंडन आणि मॉस्को येथे झालेल्या प्रदर्शनात सुनील यांचे शिल्प ठेवण्यात आले होते.