आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Competition Sena Chief Aditya Thackeray Appealed To The Young

सामान्यज्ञान स्पर्धा- युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यघटनेत नमूद केलेले हक्क आणि जबाबदार्‍यांचे संस्कार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर होणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेना, सूर्योदयपरिवारातर्फे सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी संविधानावर आधारित सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या स्पध्रेत इयत्ता पाचवी ते बारावीच्या 24 हजार 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पध्रेचे पारितोषिक वितरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी भय्यूजी महाराज, सभुचे सरचिटणीस अँड. दिनेश गंगापूरवाला, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये जाऊन साधला संवाद : या वेळी आदित्य ठाकरे यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. युवकांनी अधिकारांसोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी. या परीक्षेचा तुम्हाला लोकसेवा, राज्य सेवा, बँकिंग आदी परीक्षांसाठी मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला फ्रेंच, र्जमनीचा इतिहास शिकवला जातो; पण छत्रपती शिवाजी महाराज, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा समावेश पाठय़पुस्तकात अत्यल्प केला जातो. आज पैसे देऊन पदवी मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याला शिक्षणमंत्रीच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. यात बदलासाठी सत्तापरिवर्तन होणे आवश्यक आहे आणि त्यातही शिवशाहीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

स.भु. मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे. डावीकडून राजू वैद्य, किशनचंद तनवाणी, आमदार संजय शिरसाट, खासदार चंद्रकांत खैरे, भय्यूजी महाराज, अँड. दिनेश गंगापूरवाला, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, ऋषिकेश खैरे आदी. छाया : मनोज पराती

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

सभुतील इयत्ता नववीच्या वैभव तुपेने संपूर्ण राज्यातील युवकांसाठी एकाच ठिकाणी परीक्षा का घेत नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर युवा सेनेतर्फे राज्यभरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

स्पध्रेतील विजेते असे :

प्रथम : खुशी सिंग, वैष्णवी उचित, सौरभ नागरे, अभिजित गुंजाळ, अमित सानप, सुधाकर शेंडगे, शुभांगी घाटे, गौरव काळे
द्वितीय : र्शेया जोशी, दीपकदास चौधरी, सुदर्शन येडुबा, शिवकुमार साखरे, अनिल सुरवसे, जुही कोरडे, सायली दातार
तृतीय : आरती वर्मा, पूजा सांगळे, प्रतिभा जाधव, शाश्वती साळुंखे, उमेश बोडखे, रामेश्वर घाटे, अभिजित देशपांडे, कृष्णा देशपांडे