आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता करावरून मंगळवारी घमासान? वसुली बैठकीच्या फियास्कोनंतर सर्वच पक्ष आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मालमत्ताकराच्या विषयावर मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे. ढिसाळ करवसुली, थकबाकीचा वाढलेला डोंगर याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी या वेळी होणार असून तसे झाल्यास शिवाजी झनझन हे सर्वांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे.

मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची अत्यल्प वसुली होत असल्यामुळे विकासकामे जवळपास ठप्पच झाली आहेत. हा थकबाकीचा आकडा आता २९५ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यातील शंभर ते दीडशे कोटी रुपये जरी वसूल झाले तरी शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न पदाधिकाऱ्यांचे आहेत. त्यानुसार थकबाकी वसूल करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले होते. त्यानंतर आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने शेकडो थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या त्यांना थेट पोलिस आयुक्तांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांचा धाक दाखवून वसुली करण्याच्या या प्रयोगावर सारेच पदाधिकारी तुटून पडले तर त्या बैठकीत मालमत्ताधारकांनी आम्ही गुन्हेगार आहोत का, असा सवाल करीत संतापाला वाट करून दिली होती.

दरम्यान, महापौर तुपे यांनी मंगळवारी मनपाच्या उत्पन्नवाढीवर विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. गेल्या आठवड्यातील गोंधळानंतर नाइलाजाने का होईना प्रशासनाने वॉर्डनिहाय थकबाकीदारांच्या याद्या तयार करण्याचे काम हाती घेतले अाहे. मनपाच्या रेकॉर्डवर असलेल्या लाख ९७ हजार मालमत्ताधारकांची सिटी प्रत्येक वॉर्ड कार्यालयांना देण्यात आली आहे. दरम्यान, या विशेष बैठकीत राजकीय भूमिका काय आहे याची चाचपणी केली असता सर्वच नगरसेवक पदाधिकारी या विषयावर आक्रमक भ्ूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...