आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात जेनेरिक औषधींबाबत उदासीनतेचे चित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रुग्णांची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी मोदी सरकारने ‘जेनेरिक औषधी’बाबत घेतलेला निर्णय सध्या तरी केवळ कागदावरच दिसत आहे. देशात असलेल्या जेनेरिक औषधांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही प्रमुख शहरात घेतलेला आढावा मागणीप्रमाणे मिळत नाही जेनेरिक औषधी.....

बुलडाणा : स्वस्तात औषधे मिळण्यासाठी शासनाने जेनेरिक औषधीची केंद्र सुरू केले आहे. मुंबईतून सामान्य रुग्णालयाला औषध पुरवठा होतो. परंतु, मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे. शासनाच्या प्रिस्क्रीपमध्ये सातशेहून अधिक औषधे दाखवण्यात आली आहेत. मात्र, एवढ्या प्रमाणात औषधी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत.

नाशकात जेनेरिकचा टनांमध्ये साठा उपलब्ध : जेनेरिक औषधांचा साठा काही टनांमध्ये उपलब्ध असून सध्या कुठलीही टंचाई नाही. अगदी पाहिजे त्या आजारावरील औषधांवर जेनेरीक औषधे उपलब्ध असल्याचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे गोरख चौधरी यांनी सांगितले.

अकोल्यात औषधी लिहून दिली जात नाही
अकोला जिल्ह्यातील एकाही शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधी लिहून दिल्या जात नाही. याशिवाय खासगी रुग्णालयातीलसुध्दा हीच परिस्थीती आहे. आयएमए देखील याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. याप्रकणी कोणत्याही जनजागृती आयएमएकडून करण्यात आली नाही.

सोलापुरात मार्चपर्यंत साठा
येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात १०० टक्के जनेरिक औषधाचा पुरवठा होतो.सिव्हीलमध्ये सध्या तरी जनेरिक औषधाचा तुटवडा नाही. सर्व साधारणपणे सिव्हिलमध्ये महिन्याकाठी २० लाख रुपयांची औषधे लागतात. सध्या तरी सिव्हीलमध्ये उपलब्ध असलेली औषधे मार्चअखेरपर्यंत पुरतील. परंतु शासकीय यादीप्रमाणे काही औषधे भांडारात मिळत नाहीत, असे डॉ. उज्वला गवळी यांनी सांगितले.

अमरावतीत जेनेरिक औषधींचा साठा नाही
अमरावती जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन), संदर्भ सेवा रुग्णालय (सुपरस्पेशालिटी) व जिल्हा क्षय रुग्णालय (टीबी हॉस्पीटल) अशा चार शासकीय यंत्रणा आहेत. मात्र, यापैकी एकाही ठिकाणी जेनेरिक औषधीचा साठा नाही किंवा ती वितरित केली जावी, अशी सोयही नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांनी सांगितले.
यवतमाळमध्ये साधारण स्थिती
यवतमाळ : येथील स्व. वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाटप करण्यात येणाऱ्या औषधांपैकी ९० टक्के औषधी जेनेरिक असतात. त्यासाठी मुंबई येथे आवश्यक त्या प्रमाणात मागणी करतात. मात्र, बऱ्याचदा औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णालयात काही औषधांचा तुटवडा निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात औषधांचा वारंवार तुटवडा असायचा, असे प्रशासनाने सांगितले.