आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Journalist Tell Ellora Caves Importance On Facebook

जर्मन पत्रकार फेसबुकवर सांगतेय वेरूळ लेणीची महती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जर्मनीतील महिला पत्रकार क्रिस्टल पिल्झ यांनी वेरूळ लेणीचा नुसता अभ्यासच केला नाही, तर लेणीची दुरवस्था पाहून त्यांनी 'सेव्ह कैलास' 'फ्रेंड्स आॅफ कैलास' नावाचा ग्रुप तयार करून जगभरातील दोन हजार इतिहासप्रेमींना भारताशी जोडले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील या वारसास्थळाची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली.

मागील तीन वर्षांपासून क्रिस्टल यांनी वेरूळ लेणीचाच ध्यास घेतला. त्या मूळ जर्मन असून अनेक वर्षे त्यांनी पत्रकारितेत घालवली. बारा वर्षांपूर्वीच त्यांनी निवृत्ती घेतली. फावल्या वेळात करमेनासे झाल्याने त्यांनी हिंदू ग्रंथांचे वाचन सुरू केले. एका ग्रंथात वेरूळच्या लेणीतील कैलास शिल्पाचा फोटो त्यांनी पाहिला आणि हे ठिकाण शोधून तेथे जाण्याचा त्यांनी ध्यासच घेतला. त्या सध्या थायलंडमध्ये स्थायिक झाल्या आहेत. २०१२ मध्ये त्या वेरूळला दाखल झाल्या. कैलासचे विलोभनीय रूप पाहून त्यांनी पंधरा दिवस मुक्काम केला. तीनवर्षे केला अभ्यास : क्रिस्टलयांचे कुटुंब छोटे आहे. त्यांच्या आई १०४ वर्षांच्या अाहेत. आई आणि मुलगी देाघीच थायलंडमध्ये राहतात. त्या दोघींची काळजी मात्र जर्मन सरकार घेते. वयोवृद्ध आईला सोडून केवळ कैलासच्या प्रेमात पडलेल्या क्रिस्टल वर्षातून दोन वेळा कैलास लेणीत ध्यानासाठी येतात. त्यांची दिनचर्या फक्त कैलास आणि कैलास लेणे एवढीच आहे. पहाटे सात वाजेपासून त्या लेणीच्या गाभाऱ्यात ध्यानधारणा करतात आणि संपूर्ण दिवस लेणीत घालवून अभ्यास करतात. कैलास लेणीचे आतापर्यंत दीड लाख फोटो त्यांनी काढले आहेत.

फेंड्स आॅफ कैलासची स्थापना... : मध्यंतरीलेणीत दरड कोसळल्याची माहिती फेसबुकवरून मित्रांनी त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर ‘फ्रेंड्स ऑफ कैलास’ नावाने ग्रुप तयार करून शेकडो लोकांना वेरूळशी जोडले. त्या दररोज लेणीचे स्वत: काढलेले फोटो आणि त्याचे महत्त्व सांगणाऱ्या ओळी टाकतात. जगभरातून त्यांच्या ओळींना हजारो हिट्स मिळतात. क्रिस्टल यांनी वर्षभरापूर्वी इतिहासतज्ज्ञांची एक आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. यासोबतच वेरूळ लेणीत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली.
'आय अॅम एक्स्पर्ट इन नथिंग'
निवृत्तीनंतर फावल्या वेळेत हिंदू संस्कृतीच्या पुस्तकांचे वाचन केले. यातच वेरूळच्या कैलास लेणीची माहिती मिळाली. ती पाहण्यासाठी आले अन् तिच्या प्रेमात पडले. मी कुठल्याच विषयाची तज्ज्ञ नाही तरीदेखील कैलासच्या अभ्यासाने मला त्याचे संवर्धन करावेसे वाटते. क्रिस्टल पिल्झ, थायलंड
लेणीवर तयार केले एंजल्स साँग
कैलास लेणी हा अद्भुत नमुना आहे, असे क्रिस्टल यांचे मत आहे. या लेणीत यक्षाची काही शिल्पेही आहेत. त्यांनी जर्मन भाषेत वेरूळ लेणीची छायाचित्रे वापरून एंजल्स साँग तयार केले आहे. यात फक्त वाद्यांचे वादन आहे. परंतु ही क्लिप पाहताना कैलास शिल्प आपल्याशी जणू बोलत आहे असाच भास होतो.
छायाचित्रकार : पत्रकार क्रिस्टल पिल्झ.