आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गेट’ परीक्षेची प्रवेश प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अभियांत्रिकी शाखेत एम.टेक. करण्यासाठी घेण्यात येणार्‍या ‘गेट’ (ग्रॅज्युएट अँप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू होत असून यंदापासून विद्यार्थिनींना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.

या परीक्षेला औरंगाबादमधून दरवर्षी सात हजार विद्यार्थी बसतात. याअगोदर परीक्षेसाठी 1200 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागत होते. यंदा मात्र विद्यार्थिनींना शुल्क माफ करण्यात आले आहे. सर्वच प्रवर्गांतील मुलींसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करायला हवी. तसेच घाई न करता विचार करूनच पेपर सोडवायला हवा. कारण यात निगेटिव्ह मार्किंग पद्धती आहे. तीन तासांत 65 प्रश्न सोडवावे लागतात. या परीक्षेत पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांना मानव संसाधन विकास मिशनतर्फे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.

या शाखांचा समावेश - एअरोस्पेस इंजिनिअरिंग, अँग्रिकल्चर, एरोनॉटिकल, आर्किटेक्चर अँँड प्लॅनिंग, बायोटेक्नॉलॉजी, सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन, भौतिकशास्त्र, इन्स्ट्रुमेंटल, मेटालॉजिकल, मायनिंग, इंडस्ट्रियल फिजिक्स प्रॉडक्शन अँँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आदी शाखांचा यात समावेश आहे.
या शाखांचे ऑनलाइन पेपर - कॉम्प्युटर सायन्स अँँड आयटी इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटल, मेटालॉजिकल, मायनिंग, इंडस्ट्रियल फिजिक्स प्रॉडक्शन अँँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग.
असे आहे वेळापत्रक
1 सप्टेंबर अर्ज प्रक्रियेला सुरुवात
30 सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख
20 जानेवारी ऑनलाइन परीक्षा
10 फेब्रुवारी ऑफलाइन परीक्षा
15 मार्च निकाल जाहीर होण्याची तारीख