आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध पाण्यानंतर आता गोमूत्रही मिळणार मोफत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्याचार वर्षांपासून गुंठेवारी वसाहतींना महानगरपालिकेपेक्षाही शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या माजी आमदार किशनचंद तनवाणी मित्रमंडळाच्या वतीने आता औरंगाबादकरांसाठी मोफत गोमूत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील दोन गोशालांतून गोमूत्र जमा करण्यात येते. त्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मित्रमंडळाच्या ‘जय गय्या मय्या ग्रुप’ने उपक्रम सुरू केला.
आयुर्वेदात गोमूत्राचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. औषधी वापराबरोबरच घरात शिंपडण्यासाठी गोमूत्र वापरले जाते. परंतु शहरातील नागरिकांना ऐनवेळी गोमूत्र उपलब्ध होत नाही. धार्मिक तसेच अन्य कार्यक्रमांसाठी गोमूत्राची आवश्यकता भासते तेव्हा गाय कुणाकडे आहे, याचा शोध घ्यावा लागतो. शहरवासीयांची ही निकड लक्षात घेऊन तनवाणी मित्रमंडळाने प्रक्रिया केलेले गोमूत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

येथेगोमूत्र उपलब्ध
सध्या मित्रमंडळाच्या गुलमंडी येथील कार्यालयात गोमूत्र उपलब्ध आहे. ते सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागणी तसेच जागेच्या उपलब्धतेनुसार शहराच्या वेगवेगळ्या भागात ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.

औषधी गुण
गोमूत्रात नायट्रोजन, कॉपर, फॉस्फेट, युरिक अॅसिड, पोटॅशियम आणि सोडियम हे औषधी घटक असतात. गोमूत्रामुळे सुमारे १०८ रोग बरे होतात. गरोदर महिलांसाठी गोमूत्र सर्वाधिक उपयुक्त मानले जाते. यात विशेष हार्मोन्स आणि खनिजे आढळतात. गोमूत्र वेदनानाशक, पोटाचे विकार, चर्मरोग, श्वसनरोग, आतड्यांचे विकार, मुखरोग, नेत्ररोग, अतिसार, मुतखडा, जंत आदी रोगांवर रामबाण मानले जाते. शिवाय हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, टीबी, मिरगी, एड्स आणि मायग्रेनसारखेही आजार बरे होतात, असा दावा केला जातो.

बातम्या आणखी आहेत...